Chanakya Niti | खरी आणि चांगली व्यक्ती कशी ओळखावी? आचार्य चाणक्य काय सांगतात?

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी त्यांच्या नीति शास्त्राच सांगितल्या आहेत.

Chanakya Niti | खरी आणि चांगली व्यक्ती कशी ओळखावी? आचार्य चाणक्य काय सांगतात?
Chanakya Niti
Nupur Chilkulwar

|

Apr 04, 2021 | 9:35 AM

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी त्यांच्या नीति शास्त्राच सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी मनुष्याला त्याच्या कर्माच्याआधारे अनेक श्रेणीमध्ये विभाजित केलं आहे. त्यांचा स्वभाव आणि गुणांबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या या नीती जर आपण आपल्या आयुष्यात लागू केल्या तर त्यामुळे तुमच्या जीवनाची रुपरेषा बदलू शकते (Acharya Chanakya Tell 4 Ways To Identify Good People In Chanakya Niti).

मानुष्य संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो पण तरीही तो एखाद्या व्यक्तीला ओळखू शकत नाही, ज्यामुळे अनेकदा त्याला समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही देखील लोकांना समजण्यात सक्षम नसाल आणि वारंवार तुमचा विश्वासघात होत असेल तर तुम्हाला आचार्य चाणक्य यांच्या या नीतीबाबत नक्की वाचायला हवं, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट गुणांबाबत एका श्लोकाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.

आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीच्या पाचव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात सांगतात –

यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते निर्घर्षणं छेदनतापताडनै:। तथा चतुर्भि: पुरुषं परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा।।

या श्लोकच्या माध्यमातून आचार्य चाणक्य सांगतात की घर्षण, कापणे, उष्णता आणि मार सहन केल्यानंतर सोन्याची खरी परख होते. त्याचप्रकारे एका व्यक्तीची खरी ओळख त्याच्या आचरण, सद्गुण, त्याग आणि कर्माने होते.

एका व्यक्तीची खरी ओळख या चार गुणांवरुन केली जाऊ शकते –

1. आचार्य चाणक्य सांगतात की एक चांगला आणि खरा व्यक्ती तोच आहे ज्यामध्ये त्याग करण्याची भावना असेल. जी व्यक्ती दुसऱ्यांसाठी काही करु शकत नाही ती व्यक्ती चांगली व्यक्ती नाही.

2. एखाद्या व्यक्तीली ओखळण्यासाठी त्याचं आचरण म्हणजेच चरित्र खूप महत्त्वाचं ठरतं. जी व्यक्ती वाईटापासून दूर राहतात आणि इतरांसाठी चुकीची भावना आपल्या मनात ठेवत नाहीत ते श्रेष्ठ असतात.

3. एक व्यक्तीची खरी ओळख करण्यासाठी हे पाहणेही अत्यंत महत्त्वाचं असते की त्या व्यक्तीला नेहमी राग येतो का? दर त्या व्यक्तीला नेहमी राग येत असेल, तो नेहमी खोटं बोलत असेल, तो अहंकारी असेल आणि इतरांचा अपमान करत असेल तर असा व्यक्ती इतरांचं भलं कधीही करु शकत नाही.

4. आचार्य चाणक्य सांगतात की व्यक्ती कुठल्या परिस्थितीत कुठल्या कुळात जन्मला आहे आणि त्याचे कर्म कसे आहेत. या आधारेही एखाद्या व्यक्तीची खरी ओळख केली जाऊ शकते.

Acharya Chanakya Tell 4 Ways To Identify Good People In Chanakya Niti

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ 7 मंत्र नेहमी लक्षात ठेवा…

Chanakya Niti | तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे ‘हा’ दोष, लवकरात लवकर सोडा अन्यथा नुकसान होणार

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें