Chanakya Niti: अशी तीन कामं, जे तुमचा मान सन्मान कमी करतात, कधीच करु नका!

| Updated on: Jun 03, 2021 | 8:19 AM

आचार्य चाणक्यनं काय करावं, काय करु नये याचे नियम सांगितलेले आहेत. काय केलं म्हणजे सन्मान वाढतो आणि काय केलं नाही म्हणजे सन्मान टिकून राहतो हेही त्यांनी सांगितलेलं आहे. (Chanakya niti Three Works bring down respect And prestige)

Chanakya Niti: अशी तीन कामं, जे तुमचा मान सन्मान कमी करतात, कधीच करु नका!
Chanakya Niti
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे विद्वान होते. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातली त्यांच्याकडे दुरदृष्टी होती. त्याच्याच जोरावर त्यांनी एका सामान्य बुद्धीच्या बालकाला सम्राट पदापर्यंत पोहोचवलं. चाणक्य आयुष्यतलं अगदी छोटसं लक्ष्यही नियोजनबद्ध पद्धतीनं पूर्ण करायचे. त्यांनी आयुष्यात जे काही केलं ते निती नियमानुसारच केलं आणि नेहमीच आचरणात ‘धर्म’ आणला. (Chanakya niti Three Works bring down respect And prestige)

आचार्य चाणक्यचं म्हणणं होतं की, ज्या कामात लोकांची नियत चांगली नसते किंवा लोकहित नसतं ते काम अयोग्य आहे. अशी कामं तुम्ही करायची ठरवलं तर तुम्ही अपयशी होऊ शकता. असं काम तुम्हाला संकटाच्या अंधाराकडे घेऊन जातं. आचार्य चाणक्यनी अशी तीन कामं सांगितलेली आहेत, जी केली तर तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते.

1. खोटं बोलून फायदा घेणे

आचार्य चाणक्यचं म्हणणं होतं की, खोटारडेपणाला पाय नसतात. एक ना एक दिवस हा खोटेपणा पकडला जातो. त्यामुळेच तुम्ही खोटं बोलून जर एखादं काम करत असाल तर ते पकडलं जाण्याची शक्यता दाट आहे आणि त्यातूनच मग तुम्ही तुमचा मान सन्मान गमावू शकता. अशा खोट्या व्यक्तीला कुणी साथही देत नाही.

2. इतरांची निंदा नालस्ती करणे

काही लोकांना इतरांमधल्या त्रुटी काढण्याची, नाव ठेवण्याची सवय असते. ते ज्यावेळेसही कुणासोबत बसतात, त्यावेळेस ते कुणाबद्दल तरी वाईटच बोलत असतात. असे लोक हे नकारात्मकतेनं भरलेले असतात आणि ते नकारात्मकताच वाढवतात. अशी नेहमी इतरांवर टीका करणाऱ्या मंडळींना इतरांचं भलं झालेलं बघवत नाही. त्यामुळेच इतरांबद्दल वाईट बोलून ते स्वत:च्या मनाला शांत करतात. पण अशा लोकांना जग कधीच आदरानं बघत नाही.

3. इतरांचं वाईट करण्यासाठी पैशाचा वापर

तुमच्याकडे संपत्ती आहे, धन आहे तर त्याचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे, त्यातून तुमचा मान सन्मान वाढतो असं आचार्य चाणक्य म्हणतात. पण याच्या उलटं जर तुम्ही केलात तर तुमची लोकांमध्ये भीती राहील पण मान सन्मान कधीच मिळणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही निर्माण केलेलं भय एक ना एक दिवस संपतच, पण चांगल्या कामातून मिळवलेला, निर्माण झालेला आदर हा, तुमच्या मृत्यूनंतरही कायम राहतो.

(Chanakya niti Three Works bring down respect And prestige)

हे ही वाचा :

Chanakya Niti | या पाच गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका, कधीही विश्वासघात होऊ शकतो

Chanakya Niti : ज्या व्यक्तीजवळ या तीन गोष्टी आहेत, ती पृथ्वीवरच स्वर्ग अनुभवते