Chanakya Niti : ज्या व्यक्तीजवळ या तीन गोष्टी आहेत, ती पृथ्वीवरच स्वर्ग अनुभवते

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे धर्मनीति आणि मुत्सद्देगिरीचे अभ्यासक होते. या बरोबरच त्यांनी मानवी स्वभाव आणि काळाची अनुकूलता आणि प्रतिकूलता याबद्दल अशा सर्व गोष्टी सांगितल्या आहेत आहेत, जे अजूनही संपूर्ण मानवजातीसाठी फायदेशीर आहे.

Chanakya Niti : ज्या व्यक्तीजवळ या तीन गोष्टी आहेत, ती पृथ्वीवरच स्वर्ग अनुभवते
Acharya Chanakya

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे धर्मनीति आणि मुत्सद्देगिरीचे अभ्यासक होते. या बरोबरच त्यांनी मानवी स्वभाव आणि काळाची अनुकूलता आणि प्रतिकूलता याबद्दल अशा सर्व गोष्टी सांगितल्या आहेत आहेत, जे अजूनही संपूर्ण मानवजातीसाठी फायदेशीर आहे. आचार्य यांनी आयुष्यातील खूप कठीण काळ पाहिला आणि प्रत्येक परिस्थितीचे बारकाईने परीक्षण केले. त्यांच्या अनुभवांच्या आधारे त्यांनी मानवांना सुखी जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवला (Acharya Chanakya Said Those People Who Have These Three Things In Their Life Experienced Heavenly Feeling On Earth In Chanakya Niti).

आचार्य यांनी आपल्या चाणक्य नीति या ग्रंथात सर्वोत्कृष्ट जीवनाची अशी सर्व धोरणे सांगितली आहेत, ज्यांचे अनुसरण करुन एखादी व्यक्ती आपले जीवन सोपे आणि सुलभ बनवू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते जर एखाद्या व्यक्तीकडे या तीन गोष्टी असतील तर ही पृथ्वी त्याच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही.

यस्य पुत्रो वशीभूतो भार्या छन्दानुगामिनी
विभवे यश्च सन्तुष्टस्तस्य स्वर्ग इहैव हि.

1. चाणक्य नीतिच्या दुसऱ्या अध्यायातील तिसर्‍या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या व्यक्तीजवळ असा पुत्र असेल जो आपल्या आईवडिलांचा आदर करतो, चुकीच्या मार्गापासून दूर असेल आणि आज्ञाकारी असेल, असा मुलगा म्हणजे आई-वडिलांचा अभिमान असतो. भविष्यात तो कुळाचे नाव उज्वल करतो. अशा मुलाच्या पालकांसाठी हे जीवन स्वर्गासारखे आहे. दुसरीकडे, जर मुलगा चुकीच्या मार्गावर गेला तर त्याच्या पालकांचे आयुष्य नरकमय होते.

2. ज्या व्यक्तीची पत्नी आज्ञाधारक असेल आणि पतीचा नेहमीच आदर-सन्मानाची काळजी घेत असेल, अशा पतीचे आयुष्य स्वर्गापेक्षा कमी नसते. अशी पत्नी ही त्याची खरी सहकारी आहे, जी त्याला सुख आणि दु:खामध्ये पाठिंबा देते. त्या घरात नेहमीच आनंद आणि शांती असते. पत्नी जर नवऱ्याच्या आज्ञेचे पालन करणारी नसेल तर घरात भांडणांशिवाय काहीच घडत नाही.

3. सुसंस्कृत मुलगा आणि उत्तम पत्नी व्यतिरिक्त ज्याच्याकडे पुरेसा पैसा असेल, त्याला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. अशा घरात कुटुंबातील सदस्यांना सर्व सुख मिळतात आणि त्यांचं आयुष्य शांततेत जाते. अशी व्यक्ती प्रत्यक्षात पृथ्वीवर स्वर्ग अनुभवते.

Acharya Chanakya Said Those People Who Have These Three Things In Their Life Experienced Heavenly Feeling On Earth In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : ‘या’ चार संकटात फसला असाल तर पळ काढण्यातच शहाणपण

Chanakya Niti | या सहा परिस्थिती होते खऱ्या मित्राची पारख, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI