Chanakya Niti | या पाच गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका, कधीही विश्वासघात होऊ शकतो

योग्य आणि अयोग्यची ओळख पटणे खूप महत्वाचे आहे (Acharya Chanakya) कारण एखादी योग्य गोष्ट माणसाला आनंदाच्या मार्गावर नेऊ शकते, तर चुकीची गोष्ट त्याला मोठ्या संकटात पाडू शकते.

Chanakya Niti | या पाच गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका, कधीही विश्वासघात होऊ शकतो
Acharya-Chanakya

मुंबई : योग्य आणि अयोग्यची ओळख पटणे खूप महत्वाचे आहे (Acharya Chanakya) कारण एखादी योग्य गोष्ट माणसाला आनंदाच्या मार्गावर नेऊ शकते, तर चुकीची गोष्ट त्याला मोठ्या संकटात पाडू शकते. परंतु योग्य आणि अयोग्यची ओळख प्रत्येक व्यक्तीला पटेलच असं नाही. कारण हे ओळखण्याचे हे कौशल्य अनुभवाने येते (Acharya Chanakya Warns To Do Not Trust On These Five Things Can Be Cheat Anytime).

यामुळे, बरेच लोक जीवनात बर्‍याच वेळा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि स्वत:साठी मोठी समस्या निर्माण करुन घेतात. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत ज्या विश्वासू नाहीत आणि कोणत्याही वेळी तुमची फसवणूक करु शकतात. महान विद्वान आचार्य चाणक्य यांचा प्रत्येक शब्द म्हणजे त्यांच्या अनुभवांचे सार. त्यांच्या बोलण्यावरुन बरेच काही शिकून तुम्ही आयुष्यातील मोठ्या संकटांना टाळू शकता.

नदीनां शस्त्रपाणीनां नखीनां श्रृंगीणां तथा
विश्वासो नैव कर्तव्यः स्त्रीषु राजकुलेषु च

1. या श्लोकाद्वारे आचार्य म्हणतात की, ज्या नद्यांवरील पुल कच्चा आहे किंवा जीर्ण अवस्थेत आहे अशा नदींवर कधीही विश्वास ठेवू नये. नदीचा प्रवाह कधी वाढेल आणि कधी हा पूल कोसळेल. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात येऊ शकते.

2. ज्या लोकांकडे शस्त्रे किंवा अवजार असतील त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. त्यांना तुमची कुठली गोष्ट वाईट वाटेल आणि ते तुमच्यावर कधी शस्त्राने वार करताली याचा काहीही नेम नसतो.

3. ज्या प्राण्यांची नखे आणि शिंगे तीक्ष्ण आहेत, अशा प्राण्यांवर विश्वास ठेवू नका. आपल्याला माहित नसते की तो प्राणी कधी भडकेल आणि आपल्यावर आक्रमण करेल.

4. ज्या स्त्रिया चंचल स्वभावाच्या आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. ती कधी इतरांच्या बोलण्यात येऊन आणि तुम्हाला अडचणीत आणतील.

5. कोणत्याही राजेशाही किंवा सरकारी सेवेसंबंधित कोणत्याही व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नये. आपले रहस्य जाणून घेतल्यानंतर ती व्यक्ती कधीही आपल्याविरुद्ध त्याचा वापर करु शकतो. अशा परिस्थितीत आपण मोठ्या संकटात सापडू शकता.

Acharya Chanakya Warns To Do Not Trust On These Five Things Can Be Cheat Anytime

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : ‘या’ चार संकटात फसला असाल तर पळ काढण्यातच शहाणपण

Chanakya Niti | या सहा परिस्थिती होते खऱ्या मित्राची पारख, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात…

Chanakya Niti | ‘या’ चार प्रकारच्या व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नये, अन्यथा पश्चाताप होईल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI