
आर्य चाणक्य हे एक त्या काळातील मोठे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी पैशांचा वापर कसा करावा? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाजवळ पैसा असेल तर तो या जगात काहीही करू शकतो. त्यामुळे आयुष्यात भरपूर पैसा कमावून आरामात जीवन जगणं हे आपलं उद्दिष्ट असलंच पाहिजे. चाणक्य पुढे असेही म्हणतात मात्र काही माणसं अशी असतात जे की भरपूर पैसा कमावतात, मात्र बचत काहीच करत नाहीत, ते सर्व पैसा खर्च करून टाकतात. त्यामुळे ते कायम गरीब राहतात, जेव्हा ते म्हातारे होतात, तेव्हा त्यांच्या हातात पैसा नसतो, त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून रहावं लागतं. त्यामुळे पैसा बचतीसाठी काय करायचं? आणि पैशांचा वापर कसा कारायचा याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
पैशांची बचत करा – चाणक्य म्हणतात सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर तुम्ही पैशांची बचत करा, जर तुम्ही 100 रुपये कमावले तर त्यातील 25 रुपयांची बचत करा, जर तुम्ही पैशांची बचत केली तर तुमच्याकडे हळुहळु पैसा जमा होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल. तुमच्या म्हतारपणात तुमच्या हाताशी पैसा असेल, ज्यामुळे तुम्हाला इतर कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.
पैसा कसा खर्च करावा? – चाणक्य म्हणतात पैसा हा खर्च करण्यासाठीच असतो, तुम्ही जर नुसता पैसा कमावून ठेवला आणि तो खर्च केला नाही तर तुम्ही जगातील अनेक सुंदर गोष्टींना गमावून बसाल, मात्र हे करत असताना अनावश्यक खर्च मात्र टाळता आला पाहिजे, त्यामुळे आपल्यासाठी गरजेच्या गोष्टी कोणत्या त्या आधी लक्षात घ्या आणि त्यावरच पैसा खर्च करा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
गुंतवणूक करा – चाणक्य म्हणतात तुम्ही जो पैसा बचत केला आहे, त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, ज्यातून तुम्हाला परतावा मिळेल आणि तुमचं उत्पन्नही वाढेल, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)