AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकन, मटण आणि फिश…कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये? तज्ज्ञांचे मत काय?

चिकन, मटण आणि मासे माणसाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. या प्रोटीन आणि इतर अनेक पोषक घटक असतात. मात्र, काही प्रकृतीच्या आणि आजार असलेल्या व्यक्तींनी यास टाळण्याचा सल्ला दिला जात असतो. कोणत्या लोकांनी नॉनव्हेज टाळावे ते पाहूया...

चिकन, मटण आणि फिश…कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये? तज्ज्ञांचे मत काय?
health news
| Updated on: Jan 30, 2026 | 10:03 PM
Share

शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर चिकन, मटण आणि मासे यांना पौष्टीक म्हणून गणले जाते. जिम ट्रेनरपासून ते डाएट चार्ट पर्यंत,प्रत्येक जागी याचा उल्लेख केला जातो. परंतू सत्य हे आहे की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. अशात एखादा पदार्थ एकासाठी चांगला असेल तर दुसऱ्याला त्यापासून त्रास होऊ शकतो. नॉन व्हेज पदार्थाकडे लोक केवळ प्रोटीनचा स्त्रोत, चविष्ठपणा किंवा ट्रेंड्स म्हणून पाहातात. परंतू कमी लोकांना माहिती आहे की चिकन, मटण आणि मासे यांनी शरीरात उष्णता,कोलेस्ट्रॉल, एलर्जी, हार्मोन्स असंतुलनासारख्या समस्या तयार होतात. तज्ज्ञांच्या मते काही लोकांनी अत्यंत कमी प्रमाणात यांचे सेवन करावे. तर काही लोकांनी नॉनव्हेज खाऊच नये. सिनियर डायटीशियन यांचे मत काय आहे हे पाहूयात…

चिकन कोणी आणि का खाऊ नये ?

होलिस्टिक डायटिशियन आणि इंटेग्रेटिव्ह थेरोपेटिक न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर गीतिका चोपडा यांनी सांगितले की चिकन सर्वात लीन आणि सहज पचणारा पर्याय आहे. खासकरुन चिकन ब्रेस्ट…हे वजन घटवण्यासाठी, PCOS, डायबीटिज आणि फॅटी लिव्हरवाल्यांना प्रोटीनचा बेस्ट सोर्स मानला जातो. कारण यात फॅट कमी आढळते. मात्र, ज्या लोकांना युरिक एसिडची समस्या असते. त्यांनी चिकनचे सेवन करु नये. तसेच किडनीचा आजार असेल तरी चिकन खाऊ नये. कारण चिकनमध्ये हाय प्युरिन असते. शरीर जेव्हा प्युरिन पचवते तेव्हा त्यातून युरिक एसिड तयार होते. त्यामुळे आधीच युरिक एसिडची समस्या असणाऱ्या घातक ठरु शकते.

Chicken Eating

मटण कोणी खाऊ नये ?

मटणाचा स्वाद अनेकांना आवडतो. याची न्युट्रिशन व्हॅल्यू देखील चांगली असते. हा हेव्ही प्रोटीन सोर्स आहे. यात आयर्न देखील चांगले असते. परंतू यात हाय फॅट देखील असते. अशात हार्ट डिसीज, हाय कॉलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, कमजोर पचन वाले आणि वीक मेटाबॉलिझ्मवाले लोकांना मटण खाऊ नये. तसेच रोजच्या आहारात ही मटण खाऊ नये.जर खायचे असेल तर कमी तेल-मसाले वाले मटण खावे असे डॉ. रिऋा शर्मा ( डायटीशियन, कैलाश दीपक हॉस्पिटल) यांनी म्हटले आहे.

Mutton Paya Soup

मासे कोणी खाऊ नयेत?

मासांना सर्वात हेल्दी म्हटले जाते. मासे मेंदू आणि हार्टसाठी प्रोटीनचा बेस्ट सोर्स मानले जातात. यात ओमेगा 3 फॅटी एसिड देखील असते.ज्यामुळे इंफ्लेमेशनला कमी करण्यात ते मदत करते. डायबिटीज, थायरॉईड, हार्मोल इम्बॅलन्स आणि एजिंग क्लायंट्ससाठी फिश फायदेशीर म्हटले जातात. ज्या लोकांना सीफूडची एलर्जी आहे. किंवा किडनीची समस्या आहे. आणि फॉस्फरस रिस्ट्रीक्शन असेल तर मासे खाणे टाळावे किंवा कमी प्रमाणात खावेत.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.