Chanakya Niti : यशस्वी व्हायचंय? मग या गोष्टी कोणालाच सांगू नका

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात, चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या गुप्त ठेवण्यातच तुमचं हीत आहे.

Chanakya Niti : यशस्वी व्हायचंय? मग या गोष्टी कोणालाच सांगू नका
| Updated on: Jun 02, 2025 | 11:15 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आजही चाणक्य यांचा हा ग्रंथ अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे, अनेकांना चाणक्य यांच्या विचारांपासून प्रेरणा मिळते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आयुष्यात काय करावं आणि काय करू नये? याबाबत विस्तृत माहिती दिली आहे.

आर्य चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी या गुप्तच ठेवायला हव्यात, त्या तुम्ही इतर कोणाजवळही कधीही सांगू नका, तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असेल तरी तिच्यावर विश्वास ठेवून अशा गोष्टी सांगता कामा नये, यामुळे तुमच्या कामात अडथळा निर्माण होऊन, तुम्हाला अपयश येऊ शकतं. त्यामुळे या गोष्टी गुप्त ठेवण्यातच शहाणपण आहेत, आर्य चाणक्य यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

चाणक्य म्हणतात तुम्ही जर एखाद्या मोठ्या कामाचं नियोजन करत असाल, एखाद्या महत्त्वाच्या कामाची रणनिती आखात असाल तर अशी रणनितीबाबत कोणाशीही चर्चा करू नका, जोपर्यंत तुम्ही त्या कामात यशस्वी होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्याबाबत कोणाशीही चर्चा करू नका. कारण तुम्ही अशा गोष्टी एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून सांगितल्या आणि कालंतराने त्या व्यक्तीने जर तुमचा विश्वासघात केला तर तुम्ही संकटात सापडू शकता.

आर्य चाणक्य म्हणतात तुमच्याकडे किती पैसा आहे याबद्दल देखील कोणालाच कधीच माहिती देऊ नका, त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. त्यामुळे तुमच्याकडे किती पैसा आहे? किती धन आहे, ही गोष्टी फक्त तुम्हाला एकट्यालाच माहिती असायला हवी. लोकांना त्याबद्दल कधीही माहिती देऊ नका.

पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे की, जर तुमची एखादी कमजोरी असेल तर त्याबद्दल देखील कधीच कोणाला कल्पना देऊ नका, किंवा त्याबद्दल कोणाशी चर्चा करू नका, कारण लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)