Chanakya Niti : जगातील तीन सर्वात श्रेष्ठ दान कोणते? चाणक्य म्हणतात…

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जगातील तीन सर्वश्रेष्ठ दानाबद्दल माहिती दिली आहे.

Chanakya Niti : जगातील तीन सर्वात श्रेष्ठ दान कोणते? चाणक्य म्हणतात...
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 10:23 PM

आर्य चाणक्य हे एक मोठा अर्थतज्ज्ञ कुटनीती तज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जगातील सर्वश्रेष्ठ दान कोणते आहेत, तसेच दान कोणाला करावं? तुम्ही जे दान करता त्याचं पुण्य तुम्हाला कधी मिळतं? एखाद्या ठिकाणी केलेलं दान कसं व्यर्थ ठरू शकतं अशा एकना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात गरजू व्यक्तींना दान हे केलंच पाहिजे, या जगात दानासारखं पुण्य नाही. परंतु अनेकदा आपण चुकीच्या व्यक्तींना देखील दान करतो, त्यामुळे आपलंच नुकसान होण्याची शक्यता असते. आज आपण जाणून घेणार आहोत, जगातील तीन सर्वश्रेष्ठ दान कोणती आहेत? आणि त्याबद्दल चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल?

अन्नदान – चाणक्य म्हणतात भुकेल्या व्यक्तीला जेवणं देणं यासारखं दुसरं श्रेष्ठदान असूच शकत नाही. जे व्यक्ती भुकेले आहेत, त्यांना अन्नाची गरज आहे, अशा ठिकाणी नेहमी अन्नदान करावं. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानामुळे पुण्य लाभतं तसेच मनाला देखील समाधान मिळतं. एखाद्या व्यक्तीला पैशांची मदत करण्यापेक्षा त्याला अन्नदान करणं हे कधीही श्रेष्ठच असं चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.

Loading...

विद्यादान – चाणक्य म्हणतात अन्नदान जेवठं श्रेष्ठ आहे, तेवढंच विद्यादान देखील श्रेष्ठ आहे. कारण ज्ञानामुळेच आपण स्वत:च्या पायावर उभे राहु शकतो. त्यामुळे मानसाने नेहमी आपल्याकडे असलेलं ज्ञान हे इतरांना द्यावं. विद्यादान करावं असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

पाणी दान – चाणक्य म्हणतात एखाद्या व्यक्तीला पाणी देणं या सारखं दुसरं पुण्य नाही. ताहनलेल्या व्यक्तीची तहान भागवणं हे सर्वशेष्ठ कार्य आहे.  त्यामुळे पुण्याची प्राप्ती होते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us