AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचे सौदीला छळणाऱ्या हुतींवर दे दणादण हल्ले, आता इराणची सतावतेय भीती

पाकिस्तानच्या हवाई दलाने येमेनमध्ये इराण-समर्थित हुतींवर हल्ले केले आहेत. पाकिस्तानचा सौदी अरेबियासोबतचा मक्का करार पहिल्यांदाच अंमलात आला आहे.

पाकिस्तानचे सौदीला छळणाऱ्या हुतींवर दे दणादण हल्ले, आता इराणची सतावतेय भीती
Pakistani fighter jets attacked the Houthis
| Updated on: Oct 08, 2026 | 11:18 PM
Share

पाकिस्तानी एअर फोर्सने अखेर येमनमध्ये इराणी समर्थित हुती बंडखोरांवर हल्ले करत आपण ‘Mecca Joint Defense Treaty’चे पालन केल्याचे दाखवले आहे. त्यामुळे सौदी बरोबरच्या कराराला आपण जागलो आहोत असे पाकिस्तानने म्हटले आहे. सौदी अरबमध्ये पाकिस्तानने 8,000 सैनिक देखील तैनात केलेले आहेत. पाकिस्तानची लढाऊ विमाने हुती बंडखोरांवर बॉम्ब हल्ले करत आहेत. पण यामुळे इराण आणि युएस-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानने आता थेट इराणला डिवचले आहे. कारण हुतींना इराणचे समर्थन आहे.

न्यूयॉर्क टाईम्स (NYT)च्या बातमीनुसार सौदी अरबमध्ये हुतींनी हल्ले केल्यानंतर आता पाकिस्तानने मैत्रीला जागत सौदीला करारानंतर पहिल्यांदा मदत केली आहे. या हल्ल्यासाठी पाकिस्तानने चीनने दिलेली लढाऊ विमाने वापरली आहेत.

पाकिस्तान सैन्य दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी मोठा खुलासा करत सांगितले की पाकिस्तानचे जवान आधीच सौदी अरबमध्ये दाखल आहेत. आणि अनेक ठिकाणी मोर्चा सांभाळत आहेत. मात्र, त्यांनी त्यांची संख्या आणि पोझिशन सांगितलेली नाही. पाकिस्तानी एअर फोर्स आता सौदीत पोहचली असून हुती बंडखोरांना ठार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तिन्ही देशांनी ऑगस्टमध्ये नाटो सारखी Mecca Joint Defense Treaty करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर यास मक्का संरक्षण आघाडी असे नाव दिले आहे. या करारानुसार तिन्ही देशांपैकी एका जरी देशावर हल्ला झाला तर करारात तिन्ही देश हा आपल्यावरील हल्ला मानतील. सौदीतील तेल साठ्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी नौदल आणि वायुदलाचे सैनिक जुंपण्यात आले आहेत. आता या हल्ल्यानंतर इराणची काय प्रतिक्रीया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हुती बंडखोरांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या सोव्हिएत काळातील जुन्या मिसाईलने अमेरिकेने सौदीला दिलेले फायटर विमान पाडून मोठा धक्का दिला आहे.

हुतींनी सौदीचे महत्वाची शहरे, विमानतळे आणि अन्य आवश्यक इंफ्रास्ट्रक्चरला टार्गेट केले आहे. गुरुवारी हुतींनी रियादमध्ये किंग खालिद एअर पोर्टला टार्गेट केले होतो. यानंतर एअरपोर्टला बंद करण्यात आले होते. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा वापर केल्यानंतर मध्य पूर्वेच्या संघर्षात आता इस्लामाबादच्या भूमिकेत एक महत्वाचा बदल येऊ शकतो. पाकिस्तानने सौदी अरबशी नेहमीच सैन्य आणि आर्थिक संबंध कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु येमन युद्धात थेट सामील होण्यापासून वाचत राहिला आहे. कारण पाकिस्तानचे शेजारील देश इराणशी देखील संबंध आहेत. २०१५ रोजी पाकिस्तानच्या संसदेने सौदी अरबच्या नेतृत्वाखाली येमनमध्ये होत असलेल्या सैन्य कारवाई पासून देशाने दूर ठेवण्याच्या पक्षात व्होट दिले होते.

भारताने आपल्या नागरिकांना केला इशारा

सौदी अरेबियातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने १० ऑक्टोबरपर्यंत रियाधला जाणारी आपली विमानसेवा रद्द केली आहे. दरम्यान, सौदी अरेबियातील सर्व भारतीय नागरिकांना सतर्क आणि सावध राहण्याचा, घरातच थांबण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी अधिकृत माध्यमांद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला भारताने दिला आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच