Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती… प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
पुणे पदवीधर जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षांतर्गत चर्चेची गरज व्यक्त केली, ज्याचा रोख सुनेत्रा पवारांकडे असल्याची चर्चा आहे. तर सुनील तटकरे यांनी ही जागा न मिळणे हे सामूहिक अपयश असल्याचे म्हटले आहे. भाजपने मित्रपक्षांना गिळंकृत केल्याचा आरोपही समोर आला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आणि धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या जागेसंदर्भात पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती, असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख सुनेत्रा पवारांकडे असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही पुणे पदवीधरची जागा न मिळणे हे पक्षाचे सामूहिक अपयश असल्याचे म्हटले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये यावरून नाराजी असल्याचेही समोर आले आहे.
महायुतीच्या बैठकीत पुणे पदवीधर आणि शिक्षकची जागा भाजपकडे गेली असताना, शिक्षक मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवार कसा उभा केला, असा प्रश्नही प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीलाही पदवीधरमध्ये उमेदवार उभा करता आला असता का, याबाबत पक्षांतर्गत चर्चा अपेक्षित होती, असे त्यांचे म्हणणे आहे. अजितदादा असते तर हा प्रकार घडला नसता, असेही काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
Published on: Oct 08, 2026 08:19 PM
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....

