AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार? पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याआधी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. सोबतच बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे तसेच डीबीटी सुविधा सक्रिया असणेही गरजेचे आहे.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार? पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर
pm kisan yojanaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 11:23 PM
Share

PM Kisan Yojana : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजेच पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक चार महिन्यांत एकदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 2000 रुपये ट्रान्सफर केले जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांन थेट आर्थिक मदत केली जाते. दरम्यान, आता शेतकऱ्यांचे आता या योजनेच्या 24 व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे. हा हप्ता नेमका कधी मिळणार? असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जातोय.

चार महिने पूर्ण पैसे कधी येणार?

ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 24 व्या हप्त्याचे 2000 रुपये पाठवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याआधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 23 वा हप्ता जून 2026 मध्ये जारी करण्यात आला होता. 23 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख लक्षात घेता आता चार महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या महिन्यात शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

तारीख लवकरच घोषित होणार

दरम्यान, या महिन्यात पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. शासकीय पातळीवर अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सरकार 24 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख लवकरच घोषित करण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे

दरम्यान शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याआधी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. सोबतच बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे तसेच डीबीटी सुविधा सक्रिया असणेही गरजेचे आहे. या सर्व प्रक्रिया पार यशस्वीपणे पार पाडलेल्या असतील तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपये येतील. या योजनेचा लाभ भविष्यातही कायम सुरुच राहावा यासाठी अर्ज करताना दिलेली जमिनीची कागदपत्रे योग्य आहेत का? हेही पडताळणे गरजेचे आहे. काही दुरुस्ती असेल तर PM Kisan पोर्टलवर दुरुस्ती करता येते. गरज भासल्यास CSC केंद्रावरही जाऊन तुम्हाला तुमच्या अडचणी दूर करता येतील.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच