घरात सगळे आहेत, पण डासांचं टार्गेट तुम्हीच? काय खासियत आहे तुमच्यात? यामागे आहे भन्नाट कारण
एकाच ठिकाणी अनेक लोक असतानाही काही जणांना डास जास्त चावतात, असं तुम्हीही अनुभवलं असेल.यामागची भन्नाट कारणं जाणून घ्या.

व्यक्ती गोड असणं असं काही नसतं : सर्वात आधी तुम्ही गोड आहात म्हणून तुम्हाला जास्त डास चावतात, हा समज एकदम चुकीचा आहे.पण खरचं आजुबाजूला बसलेल्या लोकांपेक्षा तुम्हालाच डास जास्त का चावतात? याचा केव्हा विचार केलाय का?
- व्यक्ती गोड असणं असं काही नसतं : सर्वात आधी तुम्ही गोड आहात म्हणून तुम्हाला जास्त डास चावतात, हा समज एकदम चुकीचा आहे.पण खरचं आजुबाजूला बसलेल्या लोकांपेक्षा तुम्हालाच डास जास्त का चावतात? याचा केव्हा विचार केलाय का?
- डास ठराविक लोकांना चावतात : प्रत्येकाच्या शरीरातून निघणारा कार्बन डायऑक्साईड, शरीराचा वास हा वेगळा असतो. यामुळे डास ठराविक लोकांकडे जास्त आकर्षित होतात.
- कार्बन डायऑक्साईड : श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. डासांना हा वायू दूरवरूनच जाणवतो. त्यामुळे व्यक्ती कुठे आहे याचा अंदाज त्यांना घेता येतो.
- शरीराचा वास आणि तापमान : प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा वास नैसर्गिक वास हा वेगळा असतो. त्वचेवरील घाम,शरीरातील गरमी, तेल, त्यावर तयार होणरे सूक्ष्मजीव यांसारखे वास डासांना आकर्षित करतात.
- डार्क रंगाचे कपडे :डास फक्त वासाकडेच नाही तर कपड्यांच्या डार्क रंगांकडे देखील आकर्षित होतात. त्यामुळे डार्क रंगाचे कपडे घातलेल्या लोकांना डास जास्त चावतात.
- o रक्तगटाकडे जास्त आकर्षण :ज्या लोकांचे o रक्तगट असते. अशा लोकांना जास्त डास चावतात. असे सांगितले जाते. पण याचा कोणताही ठोस पुरावा नाही
- (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)
Follow Us







