Chanakya Niti : जगातील सर्वात पावरफूल गोष्ट कोणती, चाणक्य यांनी काय सांगितलं?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट आजही मनुष्याला विचार करण्यास भाग पाडते.

Chanakya Niti : जगातील सर्वात पावरफूल गोष्ट कोणती, चाणक्य यांनी काय सांगितलं?
Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 18, 2025 | 9:10 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते विचार आजही अनेकांना आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, ती प्रत्येक गोष्ट मनुष्याला विचार करायला भाग पाडते. आदर्श जीवन कसं असावं? आयुष्य जगताना काय करावं आणि काय करू नये? याचा आदर्श वस्तुपाठच चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगतिला आहे.

माणसानं आयुष्य कसं जगावं, पत्नीची कर्तव्य काय आहेत? पतीची कर्तव्य काय आहेत? आदर्श शासक कसा असावा? कोणाला मदत करावी? कोणाला मदत करू नये? कोणाला सल्ला द्यावा? कोणाला सल्ला देऊ नये, पैशांच्या बचतीच महत्त्व काय असतं? श्रमाची प्रतिष्ठा काय असते? अशे एकना अनेक विचार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मांडले आहेत.

दरम्यान जगात सर्वात शक्तिशाली अशी कोणती गोष्ट आहे, हे देखील चाणक्य यांनी सांगितलं आहे, चाणक्य म्हणतात जगात सर्वात शक्तिशाली गोष्ट तुमचे कठीण परीश्रम आजच्या भाषेत सांगायचं झालं तर हार्ड वर्क आहे. तुम्ही परीश्रमाच्या जोरावर कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकता, त्यामुळे कठीण परीश्रम हीच जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे.

चाणक्य म्हणतात या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्हाला जर एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर तुम्ही त्यासाठी हार्ड वर्क केलं पाहिजे, त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, जर तुम्हाला एखाद्यावेळी अपयश आलं तर खचून जाऊ नका. पुन्हा प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच यश मिळणार. तुम्हाला इच्छित फळ मिळणार म्हणूनच कठीण परिश्रम हीच जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)