AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : प्रचंड मेहनत करूनही काही लोक अपयशी का होतात? चाणक्य यांनी सांगितली 2 कारणं

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात असे काही लोक असतात जे प्रचंड मेहनत करतात परंतु तरी देखील ते अपयशी ठरतात, या मागे काही कारणं आहेत, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

Chanakya Niti : प्रचंड मेहनत करूनही काही लोक अपयशी का होतात? चाणक्य यांनी सांगितली 2 कारणं
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 19, 2026 | 8:21 PM
Share

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात या जगातल्या प्रत्येक माणसाची इच्छा असते, की आपण खूप मोठं व्हावं, प्रचंड पैसा कमवावा आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात आपलं नाव व्हावं. परंतु असे देखील काही लोक असतात, जे यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात, मात्र यश त्यांना हुलकावणी देतं. त्यांना फार यश मिळत नाही. या मागे अनेक कारणं असू शकतात. परंतु दोन कारणं अशी आहेत, ज्यामुळे तुमच्या अपयशाची शक्यता अधिक वाढते असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य म्हणतात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर केवळ तुम्हाला प्रचंड कष्ट करूनच चालत नाही, तर तुम्ही ज्या दिशेनं चालला आहात, ती योग्य आहे का? हे देखील तपासलं पाहिजे. समजा तुमचं लक्ष्य उत्तर दिशेला जाण्याचं आहे, परंतु तुम्ही दक्षिण दिशेनं पुढे जात असाल तर आयुष्यात तुम्ही कधीच उत्तर दिशेला पोहोचू शकणार नाहीत, त्यामुळे जर तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं असेल तर आयुष्यात योग्य दिशेनं प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संयम – चाणक्य म्हणतात संयम ही एक अशी गोष्ट आहे, जी कोणत्याही व्यक्तीच्या हातात असलेलं सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे. जर संयम नावाची गोष्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही कधीही अपयशी होऊ शकणार नाहीत. परंतु या जगात असे अनेक लोक आहेत. जे सुरुवातीला प्रचंड कष्ट करतात मात्र त्यांना जर पहिल्यावेळेस अपयश आलं तर ते लगेच प्रयत्न करणं सोडून देतात, आयुष्यभर अपयशाचं दु:ख त्यांच्या मनात तसंच राहातं. परंतु असं करू नका, तुम्हाला जर अपयश आलं असेल तर त्यातून योग्य तो धडा घ्या आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा, पहिला अनुभव तुमच्या पाठीशी असल्यामुळे दुसर्‍यांदा तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. दुसर्‍यांदा यश मिळालं नाही तर तिसर्‍यांदा तर मिळेलच मिळेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, त्यामुळे यशस्वी व्हायचं असेल तर संयम गरजेचा आहे.

दुसर्‍यांशी तुलना – चाणक्य म्हणतात तुमचं यश भलेही दुसर्‍या व्यक्तींच्या तुलनेत छोटं असेल परंतु ते तुमच्या कष्टातून मिळालेलं आहे. त्यासाठी तुम्ही प्रचंड कष्ट केलेले आहेत. त्यामुळे तुमच्या यशाची तुलना दुसऱ्या व्यक्तीसोबत कधीही करू नका. जेव्हा तुम्ही सातत्याने आपल्या यशाची तुलना दुसर्‍या व्यक्तींसोबत करता, तेव्हा तुम्हाला तुमचं यश छोटं वाटू लागतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...