Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या ठिकाणी गप्प राहण्यातच शहाणपणा

चाणक्य आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात जगात असे काही प्रसंग असतात, त्या प्रसंगी गप्प राहण्यातच तुमचा शहाणपणा असतो, जर अशा ठिकाणी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न कराल किंवा काही सल्ला द्याल, तर त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या ठिकाणी गप्प राहण्यातच शहाणपणा
चाणक्य
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 19, 2025 | 6:58 PM

आर्य चाणक्य हे त्याकाळातले एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य यांचे हे विचार आज देखील आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात असे काही प्रसंग असतात किंवा घटना असतात जिथे माणसानं गप्प राहणंच शहाणपणाचं मानलं जातं, नको तिथे जर तुम्ही तोंड उघडलं किंवा बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे तुमचंच मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, प्रसंगी तुमचा मृत्यू देखील ओढवू शकतो. त्यामुळे कुठे बोलावं आणि कुठे बोलू नये? हे माणसाला कळालं पाहिजे, एक गोष्ट लक्षात ठेवा माणसाचे शब्द हे दुधारी तलवार आहे, एकवेळ मारहाणीमुळे झालेली जखम भरून निघते, पण शब्दांमुळे झालेली जखम कधीही भरून निघत नाही, त्यामुळे बोलताना काळजी घ्यावी असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेकमं काय म्हटलं आहे ते.

चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्यासाठी काळ वाईट असतो, तुमचे शत्रू तुमच्याविरोधात कट कारस्थान रचत असतात. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका, तर अशावेळी शांत बसून फक्त परिस्थितीचं अवलोकन करा आणि संधी मिळताच घाव घाला, त्यामुळे तुमच्या शत्रूचा पराभव होईल, मात्र या काळात तुम्ही जास्त बोलू नका, कारण तुमच्या बोलण्यातून अनेकदा तुमच्या भविष्यातील योजना आणि गुपित ही उघड होत असतात, ज्याचा फयदा हा तुमच्या शत्रूला होऊ शकतो, त्यामुळे अशा ठिकाणी शांत राहण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

राजा समोर शांत रहा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही राजा समोर असतात तेव्हा शांतच रहा कारण तुमच्या बोलण्यातून अनेकदा चुकीचे शब्द बाहेर पडू शकतात, त्यामुळे राजा नाराज होण्याची शक्यता असते, राजा नाराज झाल्यास तो तुम्हाला काहीही दंड करू शकतो, अगदी मृत्यूदंड देखील त्यामुळे अशा ठिकाणी शांतच रहा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)