
हिंदू धार्मिक मान्यतेनुसार चंद्राचं विशेष महत्त्व आहे. चंद्राच्या तिथीवर पंचांग आणि इतर गोष्टींची मांडणी केली जाते. त्यामुळे चंद्र दर्शनाचं एक विशेष महत्त्व आहे.ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र मन, शांती आणि शीतलेचं प्रतीक आहे. त्यामुळे त्याच्या दर्शनाने तसे गुण मिळतात. चंद्राची स्थिती शुक्ल पक्षात कलेकलेने वाढत जाते. तर कृष्ण पक्षात अमावस्येनंतर कलेकलेने कमी होते. चंद्र अदृश्य होतो त्या दिवसाला अमावस्या, तर चंद्र पूर्ण स्थितीत असतो त्याला पौर्णिमा असं म्हणतात. आषाढ अमावस्यानंतर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा 26 जुलै 2025 रोजी शनिवारी आहे. या दिवशी चंद्राच्या दर्शनाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. अमावस्येला चंद्र आकाशात अदृश्य असतो. कारण सूर्यासोबत एकाच राशीत असतो. त्यामुळे या स्थितीत नकारात्मक उर्जेचा प्रभाव असतो. अमावस्येनंतर पहिल्यांदा चंद्र दर्शन झाल्यानंतर नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचं प्रतीक मानलं जातं.
अमावस्येनंतर चंद्र दर्शन घेतल्याने व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक उर्जेचा संचार होतो असं मानलं जातं. चंद्र दर्शनाने सौभाग्यात वृद्धी होते. तसेच घरात सुख समृद्धी येत. नव्या कामासाठी हा दिवस शुभ मानला जातो. कारण या दिवसापासून चंद्र कलेकलेने वाढत जातो. चंद्र हा मनाचा कारक असल्याने या दिवशी दर्शन घेतल्याने मानसिक शांती आणि स्थिरता प्राप्त होते. तसेच तणाव आणि चिंता दूर होते. शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शुभ कार्य पुन्हा सुरु केली जातात. चंद्र हा शीतलेचा प्रतीक आहे. त्यामुळे त्याच्या दर्शनाने शरीर आणि मनावर सकारात्मक प्रभाव पडतोय
सूर्याप्रमाणे रात्रीच्या वेळेत चंद्राला अर्घ्य देण्याची धार्मिक मान्यता आहे. चंद्राला अर्घ्य देताना पाणी, दूध आणि पांढरा फूल अर्पण केलं जातं. काही जण उपवास ठेवतात. ते चंद्रोदयानंतर उपवास सोडतात. चंद्राची स्थिती कुंडलीत भक्कम होण्यासाठी पांढऱ्या वस्तू जसं की दूध, तांदूळ, साखर किंवा पांढरी वस्त्रे दान करणं शुभ मानलं जाते. यामुळे चंद्राची कृपा होते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)