उद्यापासून वाढणार या 3 राशींच्या अडचणी; चंद्र-केतूच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग
Chandra Ketu Grahan Yog: 30 नोव्हेंबर 2026 रोजी चंद्र आणि केतूच्या युतीमुळे सिंह राशीत ग्रहणयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रातील मान्यतांनुसार, या ग्रहणयोगाचा परिणाम 3 राशीच्या लोकांवर होऊ शकतो.

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या युतीला विशेष महत्त्व दिले जाते. दोन ग्रह एकाच राशीत आल्यावर त्याचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो, असे मानले जाते. ३० नोव्हेंबर रोजी चंद्र आणि केतू यांची सिंह राशीत युती होणार आहे. यामुळे ग्रहण योग तयार होणार असल्याचे ज्योतिषीय गणनेत सांगितले जात आहे. या योगाचा प्रभाव सिंह, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. त्यामुळे कामकाजापासून कौटुंबिक आयुष्यापर्यंत काही बाबतीत या राशींनी काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणून घेऊया या तीन राशींवर काय परिणाम होऊ शकतो.
चंद्र-केतू ग्रहणयोग म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र आणि केतू हे दोन्ही ग्रह एकाच राशीत किंवा भावात असतील, तेव्हा चंद्र-केतू ग्रहणयोग किंवा ग्रहणदोष तयार होतो. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन, भावना आणि मानसिक शांततेचा कारक मानले जाते. तर केतूचा संबंध वैराग्य, अलिप्तता आणि संभ्रमाशी जोडला जातो. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे मनात द्विधा मनःस्थिती, अस्वस्थता आणि भावनिक चढ-उतार वाढू शकतात, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील या योगाचा प्रभाव ग्रहांची स्थिती, भाव, लग्न आणि अंश यांवर अवलंबून असतो.
सिंह
चंद्र आणि केतूची युती सिंह राशीतच होणार असल्याने या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. सहकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग व्यक्त करणे टाळा. बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही वादात पडण्याऐवजी संयमाने परिस्थिती हाताळणे योग्य ठरेल.
उपाय: नियमित भगवान शंकराची पूजा करावी. सोमवारी शिवलिंगावर जल, गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते.
धनु
कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक तणाव आणि थकवा जाणवू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या डेडलाइनकडे विशेष लक्ष द्यावे. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते व्यवस्थित वाचून घ्यावे.
उपाय: मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करावी आणि हनुमान चालीसाचे पठण करावे. बजरंगबलींना चोळा अर्पण करणेही शुभ मानले जाते.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना या काळात करिअर आणि कौटुंबिक आयुष्य यांचा समतोल राखताना अडचणी येऊ शकतात. कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबीयांना पुरेसा वेळ देणे कठीण होऊ शकते. घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये विचारपूर्वक पावले उचलणे योग्य ठरेल.
उपाय: शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे आणि भगवान शंकराच्या मंत्रांचा जप करावा. यामुळे मनाला शांती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
चंद्र-केतू ग्रहणदोषाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी उपाय
ज्योतिषीय मान्यतेनुसार, ग्रहण योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर दूध, पाणी, गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करून भगवान शंकराची पूजा करावी. तसेच ‘ॐ सोमाय नमः’ आणि ‘ॐ केतवे नमः’ या मंत्रांचा जप करावा. याशिवाय भगवान गणेशाची आराधना, हनुमान चालीसाचे पठण, कुत्र्यांना भाकरी खाऊ घालणे आणि पक्ष्यांना दाणे टाकणे शुभ मानले जाते. गरजू व्यक्तींना अन्न, दूध, तीळ किंवा चादरींचे दान करणेही लाभदायक मानले जाते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)