मनी प्लांट विसरा, हे झाड योग्य दिशेला लावल्यास घरात येतो प्रचंड पैसा, कोणतं आहे ते झाड?
घरात दरवाज्यावर हे एक झाड लावलं तर चुंबकासारखा पैसा खेचून येईल घरात. मात्र, योग्य दिशेला न ठेवल्यास होत नाही धन -लाभ. योग्य दिशेला लावलं तर होतो आर्थिक फायदा.

घरात सुख-समृद्धी आणि आर्थिक भरभराट व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेक जण वास्तुशास्त्राचे उपाय अवलंबतात. अशाच उपायांमध्ये सध्या ‘क्रासुला प्लांट’ विशेष चर्चेत आहे. या वनस्पतीला ‘मनी ट्री’ किंवा ‘सक्सेस प्लांट’ असेही म्हटले जाते.

वास्तुशास्त्रानुसार हा प्लॉट घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून धन आकर्षित करण्यास मदत करतो. क्रॅसुला ओवाटा या वनस्पतीची पाने जाड, चमकदार आणि मऊ असतात. असे मानले जाते की हा पौधा चुंबकाप्रमाणे पैसा आणि समृद्धी घराकडे खेचतो.

विशेष म्हणजे, तो योग्य दिशेत ठेवला तर आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते आणि करिअरमध्येही प्रगतीची संधी वाढू शकते. वास्तुनुसार हा पौधा घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते. तसेच उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जात असल्याने त्या दिशेत क्रॅसुला ठेवल्यास उत्पन्नाचे नवे मार्ग खुलू शकतात.

ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी हा पौधा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवला तर मानसिक एकाग्रता वाढून प्रमोशन आणि व्यवसायात प्रगती होण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते.

या वनस्पतीची नियमित स्वच्छता करणेही महत्त्वाचे आहे. पानांवर धूळ साचू देऊ नये, कारण ते नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तसेच हा पौधा अंधाऱ्या जागी किंवा बाथरूममध्ये ठेवू नये. योग्य जागा आणि योग्य देखभाल केल्यास क्रॅसुला घरात सकारात्मक वातावरण आणि भरभराट घेऊन येतो, अशी श्रद्धा आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)