AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टींचे करावे दान, कधीच भासणार नाही आर्थिक चणचण

हिंदू धर्मात दान धर्माला विशेष महत्त्व आहे. विशेष तिथी आणि सणाला केलेल्या दाणाचे पुण्य हे अगणित असते असं शास्त्र सांगतं. आज धनत्रयोदशी म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस आहे. आजच्या दिवशी केलेल्या दानाला विशेष महत्त्व आहे. पुण्यप्राप्तीसाठी कोणत्या गोष्टींचे दान करावे हे जाणून घेऊया.

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टींचे करावे दान, कधीच भासणार नाही आर्थिक चणचण
धनत्रयोदशी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 10, 2023 | 12:51 PM
Share

मुंबई : धनत्रयोदशीचा (Dhanteras 2023) सण आज 10 नोव्हेंबर साजरा होणार आहे, या विशेष दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी, आयुर्वेदाचे जनक आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. लोकं या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करतात, या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की धनत्रयोदशीच्या दिवशी दान करणे देखील शुभ मानले जाते. तुम्ही अनेक गोष्टी दान करू शकता ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

धनत्रयोदशीच्या दिवशी दान करणे हे महान दान मानले जाते, असे म्हटले जाते की जर तुमच्या जीवनात आर्थिक समस्या असतील. त्यामुळे या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे दान केल्याने तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल.

गरिबांना धान्य दान करा

असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी गरिबांना धान्य दान केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते, जर तुम्हालाही देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला धान्य दान करा, असे केल्याने देवी लक्ष्मीचीही कृपा होईल. पैशाची आणि धान्याची कमतरता देखील दूर होईल.

पिवळे वस्त्र दान करा

धनत्रयोदशीच्या दिवशी पिवळे वस्त्र दान करणे देखील खूप शुभ मानले जाते, असे म्हणतात की पिवळे वस्त्र दान केल्याने पुण्य प्राप्त होते. पिवळ्या रंगाचे कपडे गुरू ग्रहाशी संबंधित आहेत.

पेढ्यांचा प्रसाद वाटा

धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी पेढे आणि नारळ दान करा, असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतील, परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही या वस्तू फक्त गरजू व्यक्तीलाच दान कराव्यात.

लोखंडाचे दान

लोह दान करणे देखील खूप शुभ मानले जाते, असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या जीवनातून अशुभ दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…