AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला भगवान कुबेराला अर्पण करा ही एक गोष्ट, दूर होतील आर्थिक समस्या

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते जेणेकरून व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये. अशा परिस्थितीत धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2023) दिवशी काही उपाय केल्याने कुबेर देवाची विशेष कृपा प्राप्त होते.

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला भगवान कुबेराला अर्पण करा ही एक गोष्ट, दूर होतील आर्थिक समस्या
धनतेरस Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 08, 2023 | 2:02 PM
Share

मुंबई : घरात लक्ष्मीचा वास सदैव असावा, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी लोकं अनेक उपायही करतात. ज्योतिषशास्त्रानुसार कुबेर यांना संपत्तीचा देव मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते जेणेकरून व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये. अशा परिस्थितीत धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2023) दिवशी काही उपाय केल्याने कुबेर देवाची विशेष कृपा प्राप्त होते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेरांना पाच गोष्टी अर्पण केल्यास भगवान कुबेरांची कृपा त्याच्यावर कायम राहते. यामुळेच व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. जोतिषी पराग कुळकर्णी जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी.

धनत्रयोदशीच्या दिवशी हे उपाय अवश्य करा

पिवळ्या पदार्थांचा नैवेद्या दाखवा

भगवान कुबेर यांना पिवळ्या रंगाच्या वस्तू खूप आवडतात. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेदरम्यान भगवान कुबेरांना पिवळ्या रंगाचे अन्न अर्पण करावे. उदाहरणार्थ, पिवळ्या रंगाचे लाडू बेसन किंवा बुंदीचे बनवता येतात, पिवळ्या रंगाची गोड किंवा कुंकूची खीरही अर्पण करणे शुभ मानले जाते.

पिवळा स्वस्तिक

धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान कुबेराच्या पायावर हळद वाहावी. देवघरासमोर तूप किंवा पाण्यात हळद मिसळून स्वस्तिक काढावे. हे कुटुंबासाठी शुभ मानले जाते.

गणपतीला दूर्वा वाहा

दुर्वा गणपतीला अतिशय प्रिय आहेत. यामुळेच गणेश चतुर्थीच्या वेळी पूजेत याचा वापर केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची पूजा करताना दुर्वा वाहावे. यामुळे आनंद आणि संपत्ती तर वाढतेच पण आर्थिक समस्याही दूर होतात.

नारळ अर्पण करा

धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळी नारळ लाल कपड्यात गुंडाळून कलशावर स्थापित करा. ते शुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक संकट दूर होतात. नारळ हे लक्ष्मीचे रूप माणल्या जाते. ज्या ठिकाणी नारळ असते तिथे देवी लक्ष्मी साक्षात विराजमान असते. देवीच्या कृपेने आणि कुबेराच्या आशिवादाने या दिवशी केलेल्या उपायामुळे आर्थिक समस्या दूर होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.