AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2023 : यंदा सहा दिवस साजरी होणार दिवाळी, नोव्हेंबर महिन्यातील सणांची यादी

दिवाळीचा सण साधारणपणे 5 दिवस चालतो, ज्या दरम्यान धनत्रयोदशी, चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज हे सण साजरे केले जातात. यावेळची दिवाळी रविवार, 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. त्याचवेळी अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी दुपारी 2.57 पर्यंत राहील. त्यामुळे या दिवशी गोवर्धन पूजा न करता सोमवती अमावस्या साजरी केली जाईल.

Diwali 2023 : यंदा सहा दिवस साजरी होणार दिवाळी, नोव्हेंबर महिन्यातील सणांची यादी
दिवाळीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 25, 2023 | 1:43 PM
Share

मुंबई : नोव्हेंबर महिना अवघ्या काही दिवसात सुरू होईल. हा महिना सणांनी भरलेला आहे. महिन्याच्या सुरूवातीला हिंदी भारतीयांचा करवा चौथ हा सण साजरा होणार आहे, जो 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. दिवाळी, छठ पूजा, देवप्रबोधिनी एकादशी आणि वैकुंठ चतुर्दशी इत्यादी सण नंतर साजरे केले जातील. हा महिना हिंदू कॅलेंडरमधील कार्तिक महिना असेल. यावेळीही दिवाळी (Diwali 2023) सहा दिवस साजरी होणार आहे. नोव्हेंबरमध्ये कोणते सण साजरे होणार आहेत.

यंदा दिवाळी सहा दिवसांची

दिवाळीचा सण साधारणपणे 5 दिवस चालतो, ज्या दरम्यान धनत्रयोदशी, चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज हे सण साजरे केले जातात. यावेळची दिवाळी रविवार, 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. त्याचवेळी अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी दुपारी 2.57 पर्यंत राहील. त्यामुळे या दिवशी गोवर्धन पूजा न करता सोमवती अमावस्या साजरी केली जाईल. अशा प्रकारे 6 दिवस दिवाळीचा सण साजरा केला जाईल.

नोव्हेंबरमधील सणांची यादी

बुधवार 1 नोव्हेंबर : करवा चौथ

शुक्रवार 3 नोव्हेंबर : स्कंद षष्ठी व्रत

रविवार 5 नोव्हेंबर : पुष्य नक्षत्र, अहोई अष्टमी व्रत

गुरुवार 9 नोव्हेंबर: रमा एकादशी व्रत, गोवत्स द्वादशी

शुक्रवार 10 नोव्हेंबर: धनत्रयोदशी, यम दीपदान

शनिवार 11 नोव्हेंबर: रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी

रविवार 12 नोव्हेंबर : दिवाळी, केदार गौरी व्रत

सोमवार 13 नोव्हेंबर सोमवार: सोमवती अमावस्या

मंगळवार 14 नोव्हेंबर: गोवर्धन पूजा, अन्नकूट

बुधवार 15 नोव्हेंबर : भाई दूज

शुक्रवार 17 नोव्हेंबर: सूर्य षष्ठी आणि विनायकी चतुर्थी व्रत

रविवार 19 नोव्हेंबर: दला छठ, सूर्यषष्ठी व्रत

सोमवार 20 नोव्हेंबर – गोपाष्टमी

मंगळवार 21 नोव्हेंबर : अक्षय नवमी, आवळा नवमी

बुधवार 23 नोव्हेंबर- देवुतानी एकादशी

शुक्रवार 24 नोव्हेंबर : प्रदोष व्रत, चातुर्मास समाप्त

रविवार २६ नोव्हेंबर : बैकुंठ चतुर्दशी

सोमवार 27 नोव्हेंबर : कार्तिक पौर्णिमा

गुरुवार 30 नोव्हेंबर : गणेश चतुर्थी व्रत

दिवाळी 2023 मुहूर्त

पंचांगानुसार, कार्तिक अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:44 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 13 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:56 वाजता समाप्त होईल. दिवाळीच्या दिवशी, प्रदोषकाळात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, म्हणून 12 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मीच्या पूजेचा मुहूर्त उपलब्ध आहे.

  • लक्ष्मी पूजनाची वेळ – संध्याकाळी 05.39 – 07.35 PM (12 नोव्हेंबर 2023), कालावधी – 01 तास 56 मिनिटे
  • प्रदोष काल – 05:29 pm – 08:08 pm
  • वृषभ काळ – 05:39 pm – 07:35 pm
  • अभ्यंगस्नान सकाळी- 4.30 ते 6.15

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान