रविवारी चुकूनही खाऊ नका या गोष्टी; सूर्य होईल कमकुवत, परिणामी आयुष्यात येऊ शकतात अडचणी
रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो. त्यासाठी रविवारी काहीजण उपवास करून सूर्याची आराधना करतात. तर काहीजण सूर्याच्या मंत्राचा जप करून. पण यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे आहार. रविवारी काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे. अन्यथा त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेशी संबंधीत असतो. त्यानुसार अनेकजण उपवास, पूजापाठ ही करतात. जसं की सोमवारी भगवान शंकराची पूजा, मंगळवारी गणपतीची उपासना अशा पद्धतीने प्रत्येक वार हा ठरावित देवतांसाठी मानला जातो. त्याचपद्धतीने रविवार हा भगवान सूर्यदेवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात.
रविवारी काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत
तसेच, रविवारी करण्यासाठी काही उपायही सांगितले जातात. ज्यांच्या मदतीने कुंडलीत सूर्यदेवाची स्थिती मजबूत करता येते. तसेच जीवनात सकारात्मकता येते. तसेच रविवारचा संबंध थेट अन्नाशी संबंधित असतो असे मानले जाते. रविवारी काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. अन्यथा त्याचा थेट परिणाम आयुष्यावर होतो आणि काही गोष्टी विस्कळीत होऊ शकतात. म्हणून, रविवारी आहारात काही गोष्टींचा समावेश करणे टाळावे. त्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात.
रविवारी या गोष्टी खाऊ नयेत
रविवारसाठी काही सोपे ज्योतिष नियम आहेत. त्यांचे पालन केल्याने जीवन सुरळीत होऊ शकते, कारण जर सूर्य योग्य स्थितीत असेल तर सर्व काही सोपे होते असे म्हटले जाते. शास्त्रानुसार रविवारी काळे चणे, लाल भाज्या, मसूर आणि मीठ खाणे टाळावे. शिवाय, रविवारी तामसिक पदार्थ देखील खाणे टाळावे.
आंबट पदार्थ खाऊ नका
रविवारी आंबट पदार्थ खाऊ नयेत. किमान तसा प्रयत्न करावा. या दिवशी आंबट दही आणि आंबट फळे खाणे टाळावीत. असे केल्याने नकारात्मक परिणाम होतो. या नियमांचे पालन न केल्यास कामात व्यत्यय येऊ शकतो आणि पितृदोषस निर्माण होऊ शकतो. म्हणून, हे पदार्थ खाणे टाळावे.
उपवास करणे
काहीजण रविवारी उपवासही करतात. फक्त फळांचे सेवन करून उपवास करतात. सूर्देवतेचा आराधना करतात. त्यांच्या मंत्राचा जपही करतात. त्यामुळे फक्त सुर्यदेवतेच्या आराधनेसाठी साधा उपवास जरी केला तरीही ते लाभदायी ठरते.
या गोष्टी दान करा
रविवारी काही वस्तूंचे दान करूनही सूर्याची स्थीती मजबूत करता येते. या दिवशी लाल वस्त्रांचे दान करणे खूप शुभ मानले जाते. गूळ आणि गहू दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. लाल चंदन आणि फळे देखील दान करावीत. या वस्तूंचे दान केल्याने सुख आणि समृद्धी येते. यासोबतच तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
