तुळशीच्या झाडाजवळ या गोष्टी ठेवू नका, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते, तुम्हीही केलीये का हीच चूक?
तुळस ही प्रत्येकाच्या घरातील एक महत्त्वाचं श्रद्धा स्थान आहे. सगळ्याच्यांच घरी तुळशी मातेची पूजा करतात. घरात तुळशीचे रोप असल्याने वातावरण शुद्ध होते आणि कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते.पण अशाही काही वस्तू असतात ज्या अजिबात तुळशीजवळ ठेवू नये. कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तर निर्माण होतेच पण सोबतच आर्थिक अडचणी देखील येऊ शकतात. त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या तुळशीजवळ ठेवू नयेत हे जाणून घेऊयात.

तुळस ही आपल्या घरातील एक महत्त्वाचं श्रद्धा स्थान आहे. सगळ्याच्यांच घरी तुळशी मातेची पूजा करतात. सकाळी- संध्याकाळी दिवा लावतात. कारण तुळशीला एक धार्मिक महत्त्व आहे. तिला फार पवित्र मानले जाते. आरोग्य आणि सकारात्मक उर्जेचा स्रोत देखील आहे. घरात तुळशीचे रोप असल्याने वातावरण शुद्ध होते आणि कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते.
आपण त्यासाठी तुळस सुकू नये म्हणून पूर्ण काळजी घेतो. तिला वेळेवर पाणीही देतो. पण कधीकधी नकळत अशा काही चुका होतात ज्यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात. ती चूक म्हणजे तुळशीजवळ अशा काही गोष्टी ठेवल्या जातात त्यांच्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे या गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे. त्या कोणत्या वस्तू आहेत हे जाणून घेऊयात.
या वस्तू कधीही तुळशीजवळ ठेवू नये
कचराच्या पिशव्या, डबा किंवा घाण: तुळशीच्या रोपाजवळ घाण किंवा कचरा ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
पादत्राणे: तुळशीजवळ बूट किंवा चप्पल कधीही ठेवू नये. यामुळे तुळशीचा अपमान होतो. कारण धार्मिकदृष्ट्या तुळशीला देखील देवीच मानले जाते. तसेच असे केल्याने देवी लक्ष्मी आकर्षित होत नाही. हे अशुभ मानले जाते आणि धार्मिक दृष्टिकोनातून देखील ते निषिद्ध आहे.
लोखंडी वस्तू: तुळशीच्या रोपाजवळ लोखंडी वस्तू ठेवू नयेत. कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शास्त्रांनुसार, यामुळे घरातील समृद्धी कमी होते.
सुकलेली झाडे: तुळशीच्या रोपाजवळ काटेरी किंवा सुकलेली रोपे ठेवल्याने दुर्दैव आणि अशांततेची ऊर्जा निर्माण होते. तुळस नेहमी हिरव्यागार वातावरणात ठेवावी.
मांसाहार: तुळशीजवळ मांसाहार ठेवणे किंवा मांसाहार खाऊन तुळशीला हात लावणे हे गंभीर पाप मानले जाते. हे धार्मिक श्रद्धेच्या विरुद्ध आहे आणि त्याचा अशुभ परिणाम होतो.
मादक पदार्थ: तुळशीजवळ मद्य किंवा मादक पदार्थ ठेवणे हे देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो. यामुळे घरात गरिबी आणि कलह निर्माण होऊ शकतो.
पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुटलेल्या वस्तू: तुळशीच्या झाडाजवळ तुटलेल्या किंवा भंग पावलेल्या मूर्ती, दिवे किंवा इतर पूजा साहित्य ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील समृद्धी कमी होते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
