लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘या’ सामान्य चुका अजिबात करू नका, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येक घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीची पूजा केली जाते. तर या दिवशी काहीजणांकडून जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे पूजेदरम्यान काही चुका होतात ज्यामुळे आपल्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तर आजच्या लेखात आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या चुका टाळल्या पाहिजे ते जाणून घेऊयात...

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सामान्य चुका अजिबात करू नका, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान
Lakshmi Puja
| Edited By: | Updated on: Oct 20, 2025 | 1:51 PM

दिव्यांचा उत्सव म्हणजेच दिवाळी. तर हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीची आणि गणपती बाप्पाची विशेष प्रार्थना व पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार असे मानले जाते की दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा केल्याने तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि संपत्तीचा लाभ मिळतो. कारण लक्ष्मी देवीला धनाची देवी मानली जाते. आपल्याला जेव्हा आर्थिक अडचणी सामना करावा लागतो तेव्हा देवीची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की मनापासून लक्ष्मीदेवीची पूजा केल्याने देवी आपल्यावर प्रसन्न होऊन कृपा करते.

अशातच आपण प्रत्येकजण लक्ष्मीदेवीची पूजा नेहमीच करत असतो. आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांती टिकावा यासाठी देवीचा आशीर्वाद मिळावा लागतो. त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपायांनी तिची पूजा आपण करत असतो.

लक्ष्मी पूजनाचे नियम

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवीची आराधना व विधीवत पूजा करावी. अशातच पूजा करताना तुम्ही जर ही कामे चुकून केली तर तुम्हाला पूजेचे योग्य फळ मिळणार नाही. व देवी तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे लक्ष्मीपूजनेच्या वेळी तुम्ही कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात…

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करू नये?

तुळस: लक्ष्मी देवीला तुळशीची पाने आणि मंजरी अर्पण करण्यास मनाई आहे. म्हणून दिवाळीत लक्ष्मी पूजेदरम्यान चुकूनही तुळस अर्पण करू नका.

पांढरी फुले:- लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये मोगरा, चाफा आणि रातरानी सारखी पांढरी फुले अर्पण करू नयेत.

इतर फुले:- दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करताना रूईचे फुल आणि कनेरची फुले (ओलिअँडर)) देखील देवीला अर्पण करू नयेत, कारण ही फुले लक्ष्मी देवीला आवडत नाहीत.

लोखंडी, प्लास्टिक किंवा काचेची भांडी:- लक्ष्मीपूजनाच्या वेळी लोखंडी, प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यांचा वापर करणे देखील अशुभ मानले जाते.

मीठ: दिवाळीत लक्ष्मी पूजेपूर्वी किंवा नंतर एखाद्याला मीठ देणे किंवा संध्याकाळी एखाद्याला मीठ देणे अशुभ मानले जाते.

चुकीच्या फोटोची पूजा :- दिवाळीत लक्ष्मीपूजेसाठी अशा फोटोची पूजा करू नये ज्यामध्ये ती लक्ष्मीदेवी घुबडावर स्वार आहे, कारण त्यामुळे आर्थिक नुकसान होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)