योगिनी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ चुका , नाहीतर मिळेल अनिष्ट फळ

योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूला समर्पित आहे, जे जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांचा नाश करतात आणि धन, समृद्धी व सुख प्रदान करतात. त्यामुळे उपवासादरम्यान या चुका टाळणे आवश्यक आहे. आजच्या लेखात आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत त्याबद्दल जाणून घेऊयात.

योगिनी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका या चुका , नाहीतर मिळेल अनिष्ट फळ
| Edited By: | Updated on: Jul 28, 2026 | 9:09 PM
एका वर्षात 24 आणि अधिक मासात 26 एकादशी असतात. सर्व एकादशीचे व्रत विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित आहेत. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. द्रिक पंचांगानुसार योगिनी एकादशीचे व्रत उद्या, शुक्रवार 10 जुलै रोजी पाळले जाईल. योगिनी एकादशीला व्रतासोबतच भगवान विष्णूची पूजाही केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार योगिनी एकादशीचा उपवास केल्याने जाणूनबुजून किंवा नकळत केलेली सर्व पापे नष्ट होतात. यामुळे घरात धन, समृद्धी आणि आनंद येतो. केवळ योगिनी एकादशीचा उपवास करणे हे 88 हजार ब्राह्मणांना भोजन देण्यासारखे आहे. त्यात असे मानले जाते की उपवासा दरम्यान काही चुका केल्याने उपवास मोडतो आणि भगवान विष्णू क्रोधित होतात. म्हणून, योगिनी एकादशीला आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते आता जाणून घेऊयात

योगिनी एकादशीच्या दिवशी या चुका करू नका

तुळशीची पाने तोडणे: योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. धार्मिक मान्यतेनुसार तुळस एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसाठी जलत्याग करते. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडल्याने तुळशी मातेचा उपवास मोडू शकतो. म्हणूनच धर्मग्रंथांमध्ये एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडण्यास आणि त्यावर पाणी टाकण्यास मनाई आहे.

तामसिक पदार्थांचे सेवन: एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा, मांस किंवा मद्य यांचे सेवन टाळा. असे मानले जाते की या पदार्थांच्या सेवनाने एकादशीचा पवित्र उपवास मोडतो. तसेच, एकादशीच्या दिवशी भात खाणे टाळा.

साध्या मिठाचा वापर: उपवासा दरम्यान उपवासाचे पदार्थ तयार करताना कधीही साध्या मीठाचा वापरणे करणे शक्यतो टाळा. या उपवासात साधे मीठ खाऊ नका. उपवासादरम्यान सैंधव मीठ खाणे उत्तम मानले जाते. मान्यतेनुसार जर तुम्ही साधे मीठाचे सेवन केल्यास उपवास मोडतो.

भांडण टाळा: एकादशीच्या दिवशी बोलताना कोणाशीही भांडणं किंवा अपमानास्पद भाषा वापरू नका. कारण धार्मिक मान्यतेनुसार अशी चूक उपवासाचे फायदे नाहीसे करू शकते आणि जीवनात अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

Follow Us