AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुक्रवारच्या दिवशी करा हे पाच प्रभावी उपाय, लक्ष्मीच्या कृपेने धन-धान्यात होईल वाढ

शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी केलेल्या काही उपायांनी माता लक्ष्मी प्रसन्न होते व भक्तांच्या आर्थिक समस्या दूर करते.

शुक्रवारच्या दिवशी करा हे पाच प्रभावी उपाय, लक्ष्मीच्या कृपेने धन-धान्यात होईल वाढ
लक्ष्मीImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 06, 2023 | 7:39 PM
Share

मुंबई : हिंदू कॅलेंडरनुसार, आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. धन-समृद्धीची देवी मानल्या जाणाऱ्या देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करण्यासोबत काही ज्योतिषीय उपाय करणे फायदेशीर ठरते. इतकेच नाही तर शुक्रवारचा (Shukarawar Upay) संबंध शुक्र ग्रहाशीही आहे. शुक्र हा आकर्षण, ऐश्वर्य, संपत्ती, प्रेम इत्यादींचा कारकही मानला जातो. अशा स्थितीत शुक्रवारी काही उपाय करून तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता तसेच कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत करू शकता.

शुक्रवारी करा हे प्रभावी उपाय

या मंत्रांचा जप करा

शुक्रवारी भगवान शुक्राला प्रसन्न करण्यासाठी यापैकी कोणत्याही एका मंत्राचा सुमारे 108 वेळा जप करा – ओम शुं शुक्राय नम: या ओम हिमकुंडमृणालाभन दैत्यानान परम गुरुं सर्वशास्त्र प्रवर्तकं भार्गवम् प्रणमायहन.

कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करा

कडुलिंबाला माता दुर्गेचे रूप मानले जाते. या कारणास्तव तिला निमारी देवी असेही म्हणतात. यासोबतच ग्रह दोषांपासूनही आराम मिळतो. म्हणूनच शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे.

कमळाचे फूल अर्पण करा

शुक्रवारी सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करावे. यासोबतच देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिला कमळाचे फूल अर्पण करावे.

साखरेचे द्रावण

प्रत्येक कामात काही अडथळे येत असतील तर माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला. याचा फायदाही तुम्हाला मिळेल.

पांढऱ्या वस्तू दान करा

शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा. कारण हा रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच शुक्रवारी पांढरे वस्त्र, तांदूळ, मैदा, साखर, दूध, दही इत्यादींचे दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.