
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे, श्रावणाचा महिना पवित्र मानला जातो. श्रावणाचा महिना महादेवांना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात महादेव आणि पार्वती मातेची मोठ्या भक्ती भावानं पूजा केली जाते. व्रत आणि उपवास केले जातात. श्रावण महिन्यांमध्ये अनेक काम निषिद्ध मानण्यात आली आहेत, जसं की श्रावण महिन्यात चार्तुमास असतो त्यामुळे या काळात कुठल्याही प्रकारचे लग्न, उपनयन संस्कार, मुंडण या सारखे विधी केले जात नाहीत. तसेच श्रावण महिन्यात दाढी, कटिंग करणे, या सारखी कामं देखील करु नयेत अशी मान्यता आहे. या महिन्यात मांसहार टाळला पाहिजे, तेसच आहारात कांदा , लसून या सारख्या पदार्थांचं सेवन करू नये, असंही धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे, श्रावण महिन्यामध्ये सर्व नियम पाळून तुम्ही जर महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली तर महादेव आणि पार्वती मातेची तुमच्यावर सदैव कृपा राहाते.
श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असल्यामुळे या महिन्यात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक धार्मिक विधी करतात. त्यामध्ये महामृत्यूंजय मंत्र, महादेवांची पूजा, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र, रुद्राभिषेक यांचा समावेश आहे. तसेच श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व असते, या दिवशी लोक उपवास करून महादेवांची मनोभावे पूजा करतात. त्यामुळे महादेवांचा आशीर्वाद सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी राहातो, आज आपण अशा एका उपयाबाबत जाणून घेणार आहोत, तो उपाय जर श्रावण महिन्यात केलात तर तुम्हाला कधीही पैशांची कमी भासणार नाही, माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहली
श्रावणात करा हे काम
जर तुम्ही श्रावणात हा उपाय केला तर तुमच्यावर येणारी सर्व प्रकारची आर्थिक संकट दूर होतील, महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. तुमची प्रगती होईल. या वर्षी 11 जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तुम्ही जर श्रावण महिना सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून एक दिवा महादेवांच्या मंदिरात आणि एक दिवा बेलाच्या झाडाखाली लावला तर आयुष्यात तुम्हाला कधीच पैशांची कमी भासणार नाही, श्रावण महिन्यात दररोज सायंकाळच्या सुमारास हा दिवा लावावा, यामुळे तुमच्यावर सदैव महादेवांची कृपा राहाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)