
पितृदोषाबद्दल सर्वसामान्यपणे अशी मान्यता आहे की, जेव्हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत नाही, किंवा आपल्या पूर्वजांच्या मृत्यूपश्चात करण्यात येणारे धार्मिक विधी जर योग्य पद्धतीनं झाले नसतील तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही, तेव्हा आपल्याला पितृदोष लागतो. पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. जसं की एखादा अपघात, अचानक पैशांचं मोठं नुकसान, मानसिक तणाव, एखादं कौटुंबीक संकट, घरामध्ये भांडण या सारख्या अडचणी येऊ शकतात, अशा परिस्थितीमध्ये गुरु पौर्णिमा हा असा एक दिवस असतो, ज्या दिवशी तुम्ही आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी काही साधे आणि सोपे उपाय करू शकता. जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे.
नदीमध्ये स्नान करून तर्पण करा
गुरु पौर्मिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून एखाद्या नदीमध्ये आधी स्नान करा, तिथेच तुमच्या पित्रांसाठी तर्पण करा, असं केल्यानं तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल पितृदोष दूर होईल.
पिपंळाच्या झाडाखाली दिवा लावा
ज्या लोकांना पितृदोष आहे, ज्यांच्या कामांमध्ये वारंवार अडचणी निर्माण होतात, त्यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा, तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं, यामुळे पितृदोष दूर होतो.
ब्रह्मणांना भोजन आणि दक्षिणा द्या
असं म्हणतात की ब्राह्मणांना जेऊ घातल्यास पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, त्यामुळे गुरु पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मणांना जेऊ घाला, व दक्षिणा द्यावी, त्यामुळे घरातील पितृदोष दूर होतो.
दक्षिण दिशेला चार मुख असलेला दिवा लावा
दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, त्यामुळे दक्षिण दिशेला या दिवशी चारमुखी असलेला दिवा लावावा, यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होते. कामात येणारे अडथळे दूर होतात.
गरजू व्यक्तींना दान करा
असं म्हटलं जात की दानामुळे पितृदोष दूर होतो, त्यामुळे जे गरजू व्यक्ती असतात त्या व्यक्तींना या दिवशी दान करा, त्यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील. तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील.
गायीला चारा द्या
या दिवशी गायीला चारा देणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होतात, घरातील पितृदोष दूर होतो.
केळीच्या झाडाची पूजा करा
गुरु पौर्णिमा आज म्हणजे गुरुवारी आहे, गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं गेलं आहे, त्यामुळे पितृदोष दूर होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)