
आपण अनेकदा कोणाला तरी असं म्हणलेलं ऐकत असतो की जाऊ दे, ते माझ्या मागच्या जन्मीचं पाप असणार त्यामुळे आज हे माझ्या वाट्याला आलं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते, तेव्हा काही जण असं देखील म्हणतात की त्याने नक्कीच आपल्या मागच्या जन्मी पुण्य केलं असेल म्हणून त्याला आज ही गोष्ट मिळाली. मग खरच आपल्याला आपण मागच्या जन्मामध्ये जे कर्म करतो त्याचं फळ या जन्मात मिळत का? जाणून घेऊयात याबाबत प्रेमानंद महाराज नेमकं काय म्हणतात? प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन सुरू असताना एका महिलेनं त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला होता. की मागच्या जन्मात आपण जी कर्म केली त्याचं फळ आपल्याला या जन्मात का मिळतं?
नेमकं काय म्हणाले प्रेमानंद महाराज?
यावर बोलताना प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की, जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीची हत्या केली तर तुम्हाला लगेचच फाशी दिली जाती का? तर नाही. त्यासाठी आधी 10 -15 वर्ष न्यायालयात खटला चालतो, त्यानंतर ठरवलं जातं कोणती शिक्ष द्यायची. त्याचप्रमाणे आपल्या ब्रम्हांडामध्ये देवाचं मोठं न्यायालय आहे. मात्र जेव्हा या न्यायालयात तुमचा खटला दाखल होतो, तेव्हा तिथे तुम्ही 100 जन्म जुन्या पापांची शिक्षा देखील मिळते, तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात जी कर्म केली आहेत, त्यानुसार तुम्हाला तुमच्या पुढच्या जन्मात त्याचं फळ मिळतं.
सतत चांगले कर्म करत रहा
त्यामुळे मानसाने नेहमी आपले कर्म चांगले ठेवावेत असं देखील प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. जो वाईट कर्म करतो त्याला त्याची शिक्षा पुढच्या जन्मामध्ये नक्की मिळते, तर जो या जन्मात चांगले कर्म करतो, त्याला त्याचं चांगलं फळ पुढच्या जन्मात मिळतं, त्यामुळे माणसाने नेहमी आपली कर्म चांगली ठेवावीत, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)