Mauni Amavasya 2025: मौनी आमावस्येच्या दिवशी ‘या’ वस्तू दान करू नयेत, जाणून घ्या महत्त्वाचे नियम…

Amavasya Donation: हिंदू धर्मात, मौनी अमावस्येचा दिवस अत्यंत शुभ आणि पुण्यपूर्ण मानला जातो. मौनी अमावस्येला माघी अमावस्या देखील म्हणतात. अमावस्येच्या दिवशी दान करणे खूप फायदेशीर मानले जाते, परंतु या दिवशी काही गोष्टींचे दान करणे अशुभ असते. चला जाणून घेऊया मौनी अमावस्येच्या दिवशी कोणते दान करू नये.

Mauni Amavasya 2025: मौनी आमावस्येच्या दिवशी या वस्तू दान करू नयेत, जाणून घ्या महत्त्वाचे नियम...
मौनी आमावस्येच्या दिवशी कोणत्या वस्तू दान करू नयेत ?
| Edited By: | Updated on: Jan 20, 2025 | 4:10 PM

हिंदू धर्मात प्रत्येत आमावस्येला त्याचं स्वता:च विशेष महत्त्व दिलं जाते. परंतु माघ महिन्यात येणारी मौन आमावस्या अत्यंत खास असते. मौन आमावस्येला माघी अमावस्या देखील म्हटलं जाते. मौन आमावस्येच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून गंगास्नान करणे आणि काही विशेष गोष्टींचा दान करणे लाभदायक ठरते. मौनी आमावस्येला गंगा नदीचे पाणी अमृत होते अशी मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गंगा नदी अत्यंत पवित्र मानली जाते. गंगा जलने स्नान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व पापांचा नाश होतो. अशा परिस्थितीमध्ये मौन आमावस्येला गंगा स्नान केल्यास तुमच्या जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते.

यंदाच्या वर्षातील मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी येणार आहे. मौन अमावस्येच्या दिवशी काही विशेष गोष्टींचा दान केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते. मौन आमावस्येच्या दिवशी अनेकजण त्यांच्या भक्तीनुसार काही विशेष वस्तू दान करतात. मौनी अमावस्येच्या दिवशी पांढरी मिठाई, कपडे, तीळ, चप्पल आणि अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्धही करावे. परंतु, मौन आमावस्येच्या दिवशी काही वस्तू दान करू नये. त्यसोबतच जाणून घेऊया मौन अमावस्येच्या दिवशी नेमकं काय वस्तू दान करू नये.

अमावस्येच्या दिवशी काय दान करू नये?

मौनी अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारची लोखंडाच्या वस्तू दान करू नये.
मौनी अमावस्येच्या दिवशी मोहरीच्या तेलाचे दान करू नये.
मौनी अमावस्येच्या दिवशी चुकूनही मीठ दान करू नये.
मौनी अमावस्येच्या दिवशी तामसिक वस्तूंचे दान करू नये.
मौनी अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करू नये.

अमावस्येच्या दिवशी ‘या’ गोष्टी करू नये :

मौनी अमावस्येच्या दिवशी मद्य आणि मांसाहार करू नये.
मौनी अमावस्येच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत.
मौनी अमावस्येच्या दिवशी स्मशानभूमी किंवा निर्जन ठिकाणी जाऊ नये.
मौनी अमावस्येच्या दिवशी घरात भांडण करू नये.
मौनी अमावस्येच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये.
मौनी अमावस्येच्या दिवशी मुंडण, घरकाम इत्यादी शुभ कार्ये करू नयेत.
अमावस्येच्या दिवशी या गोष्टींचे दान केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि आर्थिक समस्या वाढू शकतात.

अमावस्येच्या दिवशी काय खरेदी करू नये?

मौनी अमावस्येच्या दिवशी झाडू, किंवा चांदीच्या वस्तू, नवीन फर्निचर, नवीन कपडे, कार, शूज, पूजा साहित्य, अगरबत्ती, फुले, पूजा थाळी, खरेदी करू नये. मौनी अमावस्येच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्यास आर्थिक संकट येऊ शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)