
मुंबई : कोरोनामुळे मागील एक वर्ष सर्वांसाठीच खूप कठीण गेलंय. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेक जण कर्जात बुडून गेले. आपल्या प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्ज किंवा कर्ज घ्यावे लागते आणि ते फेडण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. पण या सर्व प्रकियेत माणूस आतुन तुटून जातो, मानसिक तणावाखाली जातो. कधी कधी तर काही माणसे तणावात आत्महत्येचे पाऊल देखील उचलतात. पण यावर ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. हे उपाय करुन तुम्ही तुमची आर्थिकस्थिती सुधारु शकता. किंबहूना तुमची आर्थिकस्थिती सुधारण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
मंगळवारी उपवास करा
देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण भरपूर गोष्टी करतात. पण यासर्वांमधील परिणामकारक पर्याय म्हणजे उपवास. यासाठी दर मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानजींची पूजा करा. त्यांना तेल आणि सिंदूर लावा. या दिवशी तुम्ही हनुमान चालीसाही वाचू शकता.
शिवाची आराधना करा
पुराणात भगवान शिवाला भोळाशंकर म्हणतात. आराध्य दैवत असलेल्या शंकराच्या आराधनेने आपल्याला लवकर यश मिळते. आयुष्यातील दु:ख कमी करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर दूध आणि जलाने अभिषेक करा. त्याप्रमाणे ऋणमुक्तेश्वर मंत्र ॐ ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करा.
गायीला अन्नदान करा
बुधवारी गायीला चारा. मसूर त्यात तूप मिसळा आणि गाईला हाताने खाऊ घाला. यामुळे कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते.
माशांना अन्न द्या
आठवड्यातील कोणत्याही दिवशी माशांना पिठाची गोळी खायला द्या. किंवा अन्नदान करा. पुराणात अन्नदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे तुम्हाला मानसिक ताण कमी होईल आणि कर्ज फेडण्याची हिम्मतही मिळेल. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. वर सांगितलेल्या दोन्ही उपायांमुळे तुम्हाला फायदा झाला नाही तरी कोणत्या तरी मुक्या जनावराला अन्न मिळलेले.
वास्तुदोष नष्ट करा
तुमच्या घरात वास्तुदोष नसणे महत्वाचे आहे. ईशान्य कोन व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवा. असे केल्याने समृद्धी येईल आणि कर्जाचा बोजाही कमी होऊ लागेल. तुमच्या वास्तुमध्ये कोणता वास्तुदोष नाही ना याची खातरजमा नक्की करा त्याने पैसा येण्यास मदत होईल.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधित बातम्या :
Remedy for evil eye | कोणतंच काम होत नाहीय?, कामात अडथळे येतात ? मग हे उपाय करून पाहा
Vastu Tips | बक्कळ पैसा हवाय ? मग वास्तुशास्त्रात चमत्कारी मानले जाणाऱ्या कासवाची योग्य दिशा निवडा
Char Dham | अद्भुत! उत्तराखंडमधील चार धामासंबंधित काही रंजक गोष्टी