Feng Shui : पती-पत्नीमध्ये सारखे भांडणं होतायेत, हे चार उपाय घरात आणतील सुख शांती

फेंग शुई हे एक चीनी शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या दैनंदीन आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी काही सोपे -सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होऊ शकते.

Feng Shui : पती-पत्नीमध्ये सारखे भांडणं होतायेत, हे चार उपाय घरात आणतील सुख शांती
Feng Shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 8:18 PM

जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सातत्याने वाद होत असतील, तुमचं तुमच्या पतीसोबत किंवा पत्नीसोबत पटत नसेल. काहीही कारण नसताना सातत्याने खटके उडत असतील तर त्यासाठी फेगं शुई शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते, तेव्हा तुमच्या आयुष्यात या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. फेगं शुई एक चिनी वास्तुशास्त्र आहे. यामध्ये घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये प्रेम, जिव्हाळा वाढवायचा असेल तर तुम्ही देखील हे उपाय ट्राय करू शकता. आज आपण अशाच काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात फेगं शुईमध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

बेडरूमला गुलाबी रंग – फेंग शुई शास्त्रानुसार गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. जेव्हा पती-पत्नीचं पटत नाही, त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडतात. काहीही कारण नसताना भाडंण होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हा हा उपाय करू शकतात. बेडरूमला गुलाबी रंग द्यावा. यामुळे बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ सकारात्मक वातावरण निर्मितीला मदत होते. यामुळे पती-पत्नीच्या नात्यातील दुरावा दूर होण्यास मदत होते, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

Loading...

बेडरूमची दिशा आणि सजावट – फेंग शुईनुसार सुखी वैवाहिक जीवनासाठी बेड रूम ही नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला असावी.तसेच बेडरूमची सजावट करताना नेहमी हलक्या फुलक्या वस्तूंचा वापर करावा. अवजड वस्तू वापरू नये. तसेच बेडरूममध्ये कोणत्याही अवजड वस्तू ठेवू नये. त्याचा देखील तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

डॉल्फिनचा फोटो – तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये डॉल्फिनचा फोटो देखील लावू शकतात. यामुळे नात्यातील कटुता दूर होते, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे. या फोटोमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. घरात सुख, शांती येते. नात्यामधील दुरावा कमी होते, असं फेगं शुईशास्त्र सांगतं. तसेच फेंग शुई शास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा देखील ठेवू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us