Feng Shui : तुमच्या कारमध्ये ठेवा फक्त या 5 वस्तू, नकारात्मक ऊर्जा होईल दूर, टळेल मोठ्यातलं मोठं सकंटही
फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईमध्ये काही गोष्टींना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. फेंग शुई शास्त्रानुसार या वस्तू तुम्ही जर तुमच्या कारमध्ये ठेवल्या तर सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून तुमचं संरक्षण होईल, एवढंच नाही तर तुमच्यावर येणारं संकट देखील टळेल.

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईमध्ये काही गोष्टी या अत्यंत शुभ माण्यात आल्या आहेत. अशा गोष्टींमुळे तुमच्या भोवतालची सर्व प्रकारची वाईट शक्ती नष्ट होते, तसेच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होण्यास मदत होते. यामुळे तुमचा नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो, तसेच तुमच्यावरील संकट देखील दूर होतात. फेंग शुईनुसार ज्या प्रमाणे घरात काही गोष्टी ठेवणं हे शुभ असतं, त्याचप्रमाणे काही गोष्टी या आपल्या कारमध्ये देखील ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे तुमच्या आसपास असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, तसेच जर तुमच्यावर एखादं मोठं संकट येणार असेल तर ते देखील अशा गोष्टींमुळे दूर होऊ शकतं, असा दावा फेंग शुईमध्ये करण्यात आला आहे. आज आपण अशाच काही गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहूयात फेंग शुईमध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
देवी देवतांच्या मूर्ती – फेंग शुई तसेच वास्तुशास्त्रानुसार तुमच्या इष्ट देवतेच्या मूर्ती कारमध्ये ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं, कारण यामुळे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. कारमध्ये शक्यतो गणपती, किंवा हनुमान यांच्या मूर्ती ठेवल्या पाहिजेत, अशी मान्यता आहे. तुम्ही इतरही देवी-देवतेच्या मूर्ती ठेवू शकतात, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
काळ्या कासवाची मूर्ती – वास्तुशास्त्रानुसार आणि फेंग शुईनुसार कारमध्ये काळ्या कासवाची मूर्ती ठेवणं हे अत्यंत शुभ मानला जातं, कारण यामुळे तुमच्या सभोवती असेलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असं फेगं शुईमध्ये म्हटलं आहे.
चायनीज नाणी – फेंग शुईनुसार कारमध्ये चायनीच नाणी ठेवणं देखील शुभ मानलं जातं, यामुळे तुमच्या आसपास जेवढी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ती नष्ट होते. तसेच सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासून तुमचं संरक्षण होतं. तुमच्यावर येणारे सर्व प्रकारचे संकट दूर होतात, असं फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
हत्तीची मूर्ती – फेंग शुई शास्त्रानुसार तुमच्या कारमध्ये दोन छोट्या हत्तीची मूर्ती ठेवाव्यात, यामुळे नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच. परंतु अनेकदा आपण अनोळखी रस्त्याने प्रवास करत असतो, प्रत्येक रस्त्याची ऊर्जा ही वेगवेगळी असू शकते, त्याचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो, अशा स्थितीमध्ये ऊर्जा संतुलन साधण्याचं काम ही मूर्ती करते, असं फेग शुई मध्ये सांगण्यात आलं आहे.
लाफिंग बुद्धा – फेंग शुईनुसार तुमच्या कारमध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवणं देखील शुभ माण्यात आलं आहे. यामुळे तुमच्या सभोवती आनंदी वातावरणाची निर्मिती होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)