Feng Shui : अचानक सुखलेला मनी प्लांट काय संकेत देतो? घरात घडू शकतात या घटना

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे, फेंग शुईमध्ये घरात काही झाडं लावणं हे अतिशय शुभ माण्यात आलं आहे. या झाडांचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडतो, या झाडांमध्ये मनी प्लांटचा देखील समावेश होतो. परंतु जर तुमच्या घरातील मनी प्लांट अचानक सुखला तर तो तुम्हाला विशिष्ट संकेत देत असतो, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

Feng Shui : अचानक सुखलेला मनी प्लांट काय संकेत देतो? घरात घडू शकतात या घटना
money plant
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 22, 2026 | 8:56 PM

फेंग शुई वास्तुशास्त्रानुसार घरात काही झाडं लावणं, तसेच काही वस्तू जाणीवपूर्वक आणणं हे अतिशय शुभ माण्यात आलं आहे. या झाडांचा आणि वस्तुंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होत असतो. अशी झाडं तुम्ही जर तुमच्या घरात लावली तर त्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते, ज्याचा परिणाम हा तुमचं करिअर, आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर होतो. तुम्ही करिअरमध्ये उत्तम प्रगती करतात, तुमची आर्थिक स्थिती सुधारते, तुमच्या आयुष्यात येणारे सर्व प्रकारची आर्थिक संकटं दूर होतात, एवढंच नाही तर आरोग्य देखील उत्तम राहंत, याच झाडांमध्ये मनी प्लांटचा समावेश होतो, फेंग शुई शास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावणं हे अतिशय शुभ माण्यात आलं आहे. परंतु अनेकदा असं होतं की आपण आपल्या घरात मनी प्लांट लावतो, मात्र ते अचानक सुखतं. फेंग शुईनुसार सुखलेलं मनी प्लांट हा एक मोठा संकेत असतो, त्यामुळे याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, चला तर मग जाणून घेऊयात सुखलेलं मनी प्लांट नेमका कोणता संकेत देतो? आणि फेगं शुईमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

फेंग शुईनुसार जेव्हा तुमच्या घरात लावलेला मनी प्लांट अचानक सुखतो किंवा वाळून जातो तेव्हा तो फार मोठा संकेत असतो, याचा अर्थ असाही होऊ शकतो की, तुम्हाला पुढील काळात काही आर्थिक समस्या जणवणार आहेत, किंवा तुमची सध्याची आर्थिक स्थिती आहे, तशीच राहणार आहे, तुमच्या उत्पन्नामध्ये फार काही वाढ होणार नाही. तसेच अचानक खर्चात वाढ होऊ शकते, अनावश्यक गोष्टींवर देखील खर्च वाढू शकतो अशा प्रकारचे संकेत त्यामधून मिळत असतात. त्यामुळे जर अशा प्रकारे मनी प्लांट अचानक वाळून गेला असेल तर सावध होणं गरजेचं असतं, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

काय काळजी घ्यावी?

फेंग शुईनुसार जेव्हा तुमच्या घरातील मनी प्लांट अचानक सुखतो तेव्हा अशा स्थितीमध्ये तो मनी प्लांट कुंडीमधून काढून टाकावा, सुखलेला मनी प्लांट घरात जास्त दिवस ठेवू नये. त्याच्याजागी दुसरा मनी प्लांट लावावा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी जर समजा तुमचा मनी प्लांट हा पाणी न मिळाल्यामुळे वाळून गेला असेल तर ही एक सामान्य स्थिती आहे. परंतु सर्व काळजी घेऊन देखील तो वाळला असेल तर मग तो एक आर्थिक संकटाचा संकेत असू शकतो. घरात मनी प्लांट लावताना त्याचे पानं जमिनीला टेकणार नाहीत याची देखील काळजी घ्यावी. अनेक लोक दुसऱ्याच्या मनी प्लांटची चोरी करून आपल्या घरात लावतात, मात्र फेंग शुईनुसार मनी प्लांटची कधीही चोरी करू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us