AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डीच्या साई मंदिर परिसरात ड्रोन उडवणं युवकाला पडलं महागात, इंन्टाग्रामवर रील शेअर केली आणि..

रिल्स बनवण्याचा नाद एका तरूणाच्या चांगाल अंगलट आला आहे. शिर्डीच्या साई मंदिर परिसरात ड्रोनद्वारे व्हिडीओ शूट करून त्याची रील इंस्टाग्रामवर शेअर करणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डीच्या साई मंदिर परिसरात ड्रोन उडवणं युवकाला पडलं महागात, इंन्टाग्रामवर रील शेअर केली आणि..
शिर्डी साई मंदिर Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 19, 2023 | 4:51 PM
Share

मनोज गाडेकर, शिर्डी : यु ट्यूब आणि इंन्टाग्रामवर रील बनवून शेअर करण्याचा ट्रेंड दिवसंदिवस वाढतचं आहे. रील बनवण्याचा असाच एक प्रकार एका तरूणाच्या अंगलट आला. शिर्डीच्या साई मंदिर परिसरात एक किलोमीटरपर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे नियम बनवण्यात आले. शिर्डीच्या साई बाबा मंदिर परिसरात ड्रोन द्वारे शूट करून (Drone Video Shirdi Sai Mandir) त्याचा व्हिडीओ रील इंन्टाग्रामवर पोस्ट केला. ही रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.  मुंबई येथील  तरूणाने रील बनवण्यासाठी ड्रोन उडवल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यावर  हा सगळा प्रकार समोर आला.

सुरक्षेवर पुन्हा प्रश्न चिन्ह

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शिर्डी ग्रामस्थांना दर्शनासाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामस्थांसह आणि भाविकांनाही ओळख पत्राची विचारणा करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून शिर्डी देवस्थान हे अति संवेदनशील स्थळांमध्ये येते. अनेक सेलिब्रेटी आणि नेते मंडळी साई बाबांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. आता साई मंदिर परिसरात ड्रोन उडवण्याची घटना समोर आल्याने सुरक्षा प्रणाली आणखी चोख करावी लागेल असे दिसत आहे.

पंतप्रधान मोदींनीही दिली होती भेट

पंतप्रधान मोदी यांनी देखील शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन घेतले होते. कोट्यावधी रूपयांच्या विकीसकांचे त्यांनी लोकार्पण केले होते. साईबाबांच्या दर्शनासाठी तास न् तास दर्शन रांगेत उभे राहाणाऱ्या भाविकांना दिलासा देण्यासाठी. तिरूपतीच्या धर्तीवर 110 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या साई मंदिराच्या अत्याधुनिक दर्शन रांगेचेही त्यांनी लोकार्पण केले होते.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत