Tuesday | मंगळवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी व्रत करत आहात? मग या गोष्टी नक्कीच पाळा…

| Updated on: Aug 16, 2022 | 9:44 AM

मंगळवारी मीठाचे सेवन करू नये. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात आणि आरोग्यामध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. यामुळे जर तुम्ही मंगळवारी व्रत ठेवले असेल तर कोणत्याच अन्नाच्या माध्यमातून मिठाचे सेवन करू नका. फराळामध्येही मिठ घेऊ नका.

Tuesday | मंगळवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी व्रत करत आहात? मग या गोष्टी नक्कीच पाळा...
Follow us on

मुंबई : मंगळवार (Tuesday) हा हनुमानजी आणि मंगलदेवांना समर्पित वार आहे. या दिवशी व्रत आणि हनुमानजींची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हटले जाते. या दिवशी व्रत ठेवल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह अधिक चांगला होतो. मात्र, मंगळवारी व्रत ठेवल्यानंतर आपण काही महत्वाच्या (Important) गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर व्रत ठेऊनही आपला काहीच फायदा (Benefit) होणार नाही. या दिवशी अनवधानाने झालेल्या चुकांनामुळे हनुमानजी आपल्यावर नाराज देखील होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया की यादिवशी आपण कोणत्या गोष्टी करणे टाळायला हवे.

हे काम मंगळवारी अजिबात करू नका

मंगळवारी मीठाचे सेवन करू नये. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात आणि आरोग्यामध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. यामुळे जर तुम्ही मंगळवारी व्रत ठेवले असेल तर कोणत्याच अन्नाच्या माध्यमातून मिठाचे सेवन करू नका. फराळामध्येही मिठ घेऊ नका. शक्यतो या दिवशी फळांचे अधिक सेवन करा. यामुळे मीठ खाण्याचा काहीच संबंध येत नाही.

 पश्चिम आणि उत्तर दिशेला प्रवास करणे टाळा

मंगळवारी पश्चिम आणि उत्तर दिशेला प्रवास करणे 100 टक्के टाळायला हवे. जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव या दिशांना प्रवास करायचा असेल तर गूळ खाल्ल्यानंतर घरातून बाहेर पडा. मंगळवारी मांस, मासे आणि अंडी खाऊ नका. शक्यतो मंगळवारी प्रवास करूनच नका जर खूप महत्वाचे काम असेल तर गूळ खाऊन घराच्या बाहेर पडा.

हे सुद्धा वाचा

मंगळवारी कोणालाही पैसे अजिबात देऊ नका

मंगळवारी कोणीही कर्ज देऊ नये. या दिवशी कर्ज दिल्यास ते परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. या दिवशी कोणाकडून घेतलेले पैसे तुम्ही परत करू शकता. यामुळेच मंगळवारी पैसांचे व्यवहार कमी करा. तसेच कोणीही जरी तुम्हाला मंगळवारी पैसे मागायला आले तरी टाळा. कारण ते पैसे परत येण्याची अजिबात शक्यता नसते.

रागावर नियंत्रण ठेवायला शिका तर फायदा होईल

मंगळवारी राग करणे टाळावे कारण ते आपल्या आयुष्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच या दिवशी कोणाशीही भांडण करू नये. लोखंडी वस्तू खरेदी करू नका, या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते. या दिवशी स्टीलची भांडी आणि धारदार वस्तू जसे की नेल कटर, चाकू आणि कात्री खरेदी करू नये. या दिवशी नवीन वाहन खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते.

(लेखात देण्यात आलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही)