AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ganeshotsav 2022: गणपतीला का म्हणतात एकदंत? काय आहे यामागची कथा

ganeshotsav 2022 Why Ganesha is called Ekdanta The story behind what is

ganeshotsav 2022: गणपतीला का म्हणतात एकदंत? काय आहे यामागची कथा
| Updated on: Sep 06, 2022 | 12:39 PM
Share

सध्या देशभरात दहा दिवसांचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा केला जातो. घरोघरी, गल्लीबोळात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपतीच्या विविध रूपांची भाविक मनोभावे पूजा करीत आहेत. गणपतीचे तब्बल 108 नाव आहे. त्यापैकी एक नाव एकदंत (Ekadanta) आहे. म्हणजे एक दात असलेला. गणपतीचा एक दात कसा तुटला याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्याला एकदंत कसे का  म्हणतात? गणपती एकदंत असल्याच्या अनेक आख्यायिका (story) आहेत.

परशुराम ऋषींसोबत झालेल्या युद्धात तुटला दात

गणेश पुराणानुसार, एकदा ऋषी परशुराम भगवान भोलेनाथांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले. त्यावेळी महादेव तपश्चर्येत लीन झाले असता, भगवान गणेशाने परशुरामांना शिवाला भेटण्यासाठी थांबण्यास सांगितले. यामुळे परशुराम संतप्त झाले. यानंतर गणपती आणि परशुराम यांच्यात युद्ध  झाले. या दरम्यान परशुरामाच्या  प्रहारामुळे गणपतीचा एक दात तुटला.गणपती वेदनेने विव्हळू लागले. गणपतीचे दुःख पाहून माता पार्वती परशुरामावर कोपली. नंतर ऋषी परशुरामाने देवी पार्वतीची क्षमा मागितली आणि बाप्पाला त्यांची शक्ती, सामर्थ्य आणि ज्ञान दिले.

तुटलेला दात गणपती ठेवतात हातात

गणपतीच्या तुटलेल्या दाताबद्दल आणखी एक आख्यायिका प्रचलित आहे. एकदा कार्तिकेय आपल्या कामात मग्न होता. गणपती त्यांच्या कामात वारंवार अडथळे निर्माण करत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्तिकेयाने गणपतीचा एक दात तोडला. महादेवाच्या सांगण्यावरून कार्तिकेयाने गणपतीला तो दात परत केला, पण त्याचवेळी गणेशजींना हा तुटलेला दात नेहमी हातात ठेवावा लागेल असे सांगितले. अशा अनेक आख्यायिका प्रचलित आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.