AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garud Puran : यशस्वी व्हायचे असेल तर लगेच सोडा या सवयी, गरूड पूराणात सांगीतले आहे महत्व

जीवनात यश मिळविण्यासाठी, काही कार्ये नित्यक्रमात समाविष्ट करणे खूप महत्वाचे आहे. थोडक्यात चुकीच्या सवयींचा त्याग करून चांगल्या सवयींचा अवलंब केल्यास माणसाच्या पदरी यश पडते.

Garud Puran : यशस्वी व्हायचे असेल तर लगेच सोडा या सवयी, गरूड पूराणात सांगीतले आहे महत्व
गरूड पुराणImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 25, 2023 | 7:22 PM
Share

मुंबई :  सनातन धर्मात गरुड पुराणाचे (Garud Puran) विशेष महत्त्व असून एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी 12 दिवस गरुड पुराणाचे पठण केले जाते. जेणेकरून मरण पावलेल्या व्यक्तीचा आत्मा सर्व भ्रमांचा त्याग करून दुसऱ्या जगात जाऊ शकेल. गरुड पुराणात जीवनापासून मृत्यूपर्यंतची अनेक रहस्ये उलगडली आहेत. सोबतच हे देखील सांगण्यात आले आहे की, माणसाने आयुष्यात कसे वागले पाहिजे जेणेकरून त्याला कधीही दुःखाचा सामना करावा लागू नये. जीवनात यश मिळविण्यासाठी, काही कार्ये नित्यक्रमात समाविष्ट करणे खूप महत्वाचे आहे. थोडक्यात चुकीच्या सवयींचा त्याग करून चांगल्या सवयींचा अवलंब केल्यास माणसाच्या पदरी यश पडते.

या सवयी तुम्हाला बनवतील यशस्वी

  • जीवनात अहंकार बाळगणाऱ्याचा नाश होणार हे निश्चित. गरुड पुराणानुसार अहंकार हा माणसाचा शत्रू आहे, त्यामुळे कधीही तुमच्या आत अहंकार येऊ देऊ नका. ज्या लोकांमध्ये अहंकार असतो ते इतरांना तुच्छ समजतात. यामुळे इतरांना त्रास होतो आणि ते दुःखी होतात. हे महापाप मानले जाते. म्हणूनच कधीही गर्वाला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका आणि नम्रपणे वागा.
  • ईर्ष्यामुळे स्वतःचाही नाश होतो कारण अशा व्यक्तीला इतरांच्या सुखाचा हेवा वाटतो आणि इतरांना हानी पोहोचवण्यासाठी स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवतो. म्हणूनच जर तुम्ही मत्सर करत असाल तर तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि आयुष्यात कधीही आनंद घेऊ शकणार नाही.
  • जेव्हा आपण कष्ट करून पैसे कमावतो तेव्हाच आपल्याला आनंद मिळतो. पण जर तुम्ही दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ धरून त्याची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या आयुष्यात आनंद कधीच येऊ शकत नाही. कितीही पैसा गोळा केला तरी जीवनात शांती मिळू शकत नाही.
  • इतरांचे वाईट करून तुम्ही स्वतःमध्ये नकारात्मकता आणता. यासोबतच अशा लोकांना स्वतःलाही अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. ही सवय तुमचा कधीच फायदा करू शकत नाही. हे महापाप मानले जाते. असे लोक इकडे-तिकडे गोष्टीत आपला वेळ वाया घालवतात आणि खूप मागे राहतात. जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही इतरांचे वाईट टाळले पाहिजे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.