Vastu Ideas | मालामाल व्हायचे आहे? मग देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उत्तर दिशेला ‘या’ गोष्टी ठेवा, आयुष्यात कधीही पैशाची चणचण भासणार नाही!

| Updated on: Feb 15, 2022 | 10:04 AM

युष्यात कितीही पैसा असला तरी तो आपल्याला कमीच वाटतो. दिवसागणिक आपल्या गरजा वाढतात. त्यामुळे आपल्याला पैसा लागतोच .

Vastu Ideas | मालामाल व्हायचे आहे? मग देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उत्तर दिशेला या गोष्टी ठेवा, आयुष्यात कधीही पैशाची चणचण भासणार नाही!
Mata-Laxmi-and-vastu-tips
Follow us on

मुंबई :  आयुष्यात कितीही पैसा असला तरी तो आपल्याला कमीच वाटतो. दिवसागणिक आपल्या गरजा वाढतात. त्यामुळे आपल्याला पैसा लागतोच . वास्तुशास्त्रात अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या गोष्टी आत्मसात केल्याल तुम्हाल देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. देवी लक्ष्मीचे (laxmi) आणि उत्तर दिशेचे विशिष्ट्य नाते आहे. घरात जर वास्तु दोष असेल तर आसपासचं वातावरण नकारात्मक होते. अनेक शुभ कार्यात अनावश्यक अडथळे येतात (Vastu Tips). वास्तुशास्त्रात, दिशांचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वेगवेगळ्या देवतांची उपासना करावी लागते. वास्तुशास्त्रात दिशांचे महत्त्व सांगितले आहे . वास्तू नियमानुसार घर असो किंवा खोली, स्नानगृह इत्यादी वस्तू किंवा योग्य दिशेला ठेवलेल्या वस्तू व्यक्तीला शुभफळ (Benifits) देतात आणि त्याच्या प्रगतीचे कारण बनतात. उलट या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर आपण उत्तर दिशेबद्दल बोललो तर ती कुबेराची दिशा मानली जाते. अशावेळी जर तुम्हाला घर नेहमी पैशांनी भरलेले असावे असे वाटत असेल तर तुम्ही उत्तर दिशेशी संबंधित हे महत्त्वाचे नियम नेहमी लक्षात ठेवा.

प्रवेशद्वार
वास्तुशास्त्रानुसार घराची मांडणी करणे खूप शुभ मानले जाते. असं म्हटलं जातं की घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेला नसेल तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. घराचे मुख्य किंवा प्रवेशद्वार नेहमी उत्तर दिशेला असावे. तर दुसरीकडे घराचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला असेल तर माता लक्ष्मीची कृपा राहते आणि व्यक्तीला पैशाची कमतरता भासत नाही.

काच
घरामध्ये असलेल्या काचेशी संबंधित वास्तू दोष देखील समस्या निर्माण करू शकतात. असे म्हटले जाते की जर आरसा योग्य दिशेला लावला नाही तर पैशाची कमतरता देखील होऊ शकते. वास्तूनुसार घराचा आरसा उत्तर दिशेला असावा.

मनी प्लांट
घरामध्ये मनी प्लांट ठेवणे खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, घरात लावलेला मनी प्लांट जितक्या लवकर वाढतो, तितक्या लवकर त्या घरात सुख-समृद्धी आणि संपत्तीही वाढते. एवढेच नाही तर मनी प्लांट लावल्याने घरामध्ये सकारात्मक उर्जाही राहते.

स्वयंपाकघर
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर उत्तर दिशेला असावे. असे असणे अत्यंत शुभ मानले जाते. हे नेहमी माता अन्नपूर्णाच्या आशीर्वादाचा वर्षाव करते. अन्नपूर्णा मातेच्या कृपेने अन्नाचा साठा भरून जातो.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

08 February 2022 Panchang | 8 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या मंगळवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Masik Durga Ashtami February 2022 : आज माघ दुर्गाष्टमी, जाणून घ्या तिचे महत्व आणि तिथी

Indian Traditions | भारतीय परंपरेतील विज्ञानाशी सांगड घालणाऱ्या जुन्या पारंपारिक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?