रस्त्यावर सापडले सोने, उजळणार भाग्य की संकटं घरी येणार? ज्योतिष सांगते काय?

Gold Found on Road: रस्त्यावरून जाताना अनेकदा पैसे, मोठी बॅग, सोने सापडते. पण ते घरी आणणे हे भाग्याचे आहे की त्यामुळं संकटं येतात, काय आहे ज्योतिष शास्त्राचा सल्ला? महागड्या वस्तूंमागे दोषही घरात येतो का?

रस्त्यावर सापडले सोने, उजळणार भाग्य की संकटं घरी येणार? ज्योतिष सांगते काय?
| Updated on: Apr 23, 2026 | 4:07 PM

Gold Found on Road: रस्त्यावरून जाताना अनेकदा पैसे, छोट्या-मोठ्या वस्तू, सोने, चांदीची दागिने सापडतात. आता याला संकेतानुसार आपण नशीब फळफळले म्हणू शकतो. पण ज्योतिष आणि शकून शास्त्र मात्र याचे वेगळे संकेत देते. हिंदू धर्मशास्त्रात सोने धातूला पवित्र आणि लक्ष्मीचे प्रतिक मानल्या गेले आहे. असायस, कष्ट न करता मिळालेले धन आणि नशीब फळफळणे हे सामाजिक चालीरीतीत जरी ग्राह्य असले तरी ज्योतिष आणि शकून शास्त्र त्याच्या अगदी विरुद्ध आहे.

सोने सापडणे शुभ की अशुभ?

शकून शास्त्रानुसार, सोने मिळणे हा काही केवळ योगायोग नाही. तर भविष्यतील काही घटनांचे संकेत सुद्धा आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो की रस्त्यावर सोने सापडणे हे शुभ आहे की अशुभ? काही लोकांना हे लक्ष्मीचे वरदान वाटते. काहींना देवाने केलेली तजवीज वाटते. ज्याला जसा अर्थ काढायचा तसा तो घेतो. पण शकून शास्त्र या सर्व शक्यता नाकारते. या शास्त्रानुसार, ज्याचे सोने हरवते, त्याची नकारात्मक ऊर्जा या सोन्यासह तुम्ही घरी आणता. कुणाच्या तरी महत्त्वाच्या कामासाठी तो धातू उपयोगी पडत असतानाच तो गमावला जातो. ती व्यक्ती दुखी आणि कष्टी असते. तिचा अमूल्य धातू हरवतो. तिच्या वेदना या धातूसोबत घरी येतात.

सोने हरवणे हा ग्रहांचा फेरा

तर त्याचवेळी सोने हरवणे हा पण एक संकेत आहे. लक्ष्मी, गुरू देवतेची ती नाराजी मानली जाते. तर ग्रहांच्या बदलाचे ते संकेत मानले जातात. अथवा तुमच्याकडून कळत नकळत झालेली मोठी चूक दाखवण्याचा तो संकेत असू शकतो.

आर्थिक नुकसान – सोने हरवणे याचा अर्थ देवता, ग्रहांची नाराजी आहे. भविष्यातील संकटाची चाहुल आहे.

बृहस्पती दोष – कुंडलीत गुरू कमकुवत होण्याचे हे मोठे संकेत मानले जातात

कोणत्या दागिन्यांचा काय परिणाम

शकुन शास्त्रानुसार जर सोन्याची अंगठी हरवली असेल तर त्याचा अर्थ आगामी काळात वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता असते. तर आरोग्यासाठी ही बाब चांगली नसते.

नाक अथवा कानातील दागिने हरवणे – जर नाक, गळ्यातील दागिने हरवले तर याचा अर्थात मान-सन्मानाला मोठा फटका बसण्याचे संकेत शकून शास्त्र सांगते.

नकारात्मक ऊर्जेपासून कसे वाचाल

शकून शास्त्रानुसार, जर तुम्हाला कुणाचे हरवलेले सोने सापडले असेल तर अगोदर ते कुणाचे हरवले आहे याची विचारपूस करा. पोलिसांकडे ते द्या. त्याची माहिती घ्या. पोलिसांनी ते योग्य व्यक्तीकडे तपास करून दिले की नाही याची खात्री बाळगा.

जर अचानक सोने गवसले आणि त्याचा मालक सापडला नाही तर ते सोन्यातील एक छोटा तुकडा गरजूला द्या. कुणाच्या भल्यासाठी त्याचा वापर करा. बरेच दिवसापासून कोणी त्यावर दावा केला नाही तर सोने विक्री करून त्यातील मोठी रक्कम गरजूंसाठी वापरा. एखाद्या गरीब मुलाची शाळेचे शुल्क, दप्तर, गणवेश, पुस्तकं यासाठी ती रक्कम खर्च करा. गरजवंताला अन्न दान करा. सत्कार्यासाठी त्यातील मोठी रक्कम खर्च करा. नकारात्मक ऊर्जेचा परिणाम कमी होईल. बृहस्पती, गुरुची पूजा करा.

डिस्क्लेमर: ही ज्योतिष, शकून शास्त्र, धर्मशास्त्रानुसार दिलेली माहिती आहे. त्याची पुष्टी टीव्ही ९ मराठी करत नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us