AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुधाचा चहा प्यायल्यानंतर ॲसिडिटी होतेय? तर गॅस टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

काही लोकांना दुधाचा चहा प्यायल्यानंतर लगेचच आम्लपित्त किंवा गॅसचा त्रास होतो. ज्यांना चहा किंवा कॉफी आवडते, त्यांच्यासाठी ते एका व्यसनासारखेच असते. पण ते प्यायल्यानंतर अपचन आणि गॅस कशामुळे होतो? चला, एका तज्ञाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे समजावून सांगू.

दुधाचा चहा प्यायल्यानंतर ॲसिडिटी होतेय? तर गॅस टाळण्यासाठी करा 'हे' उपाय
milk tea cause gastric acidityImage Credit source: Pexels
| Edited By: Sanjay patil | Updated on: Jun 12, 2026 | 4:01 AM
Share

चहा हा प्रत्येक भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्यापैकी अनेकांची दिवसाची सुरूवात गरमागरम चहाने होते. सकाळचा हा प्रत्येकाला ताजेतवाना करण्यासाठी लागतोच. तर काही लोकं दिवसातून दोन वेळा चहा पितात ता काही जण दिवसभरात अनेक कप पिण्याची सवय लावून घेतात. पण कधीकधी उपाशीपोटी चहा घेतल्यास ॲसिडिटी किंवा गॅसची समस्या होते तसेच ज्यांना ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी चहा नुकसानकारक असू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, या समस्या टाळण्यासाठी आहाराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण दुधाचा चहा प्यायल्यानंतर उद्भवणाऱ्या ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे याबद्दल जाणून घेऊयात.

तज्ज्ञ सांगतात की जेव्हा पोटातील ग्रंथी अन्न पचवण्यासाठी जास्त प्रमाणात ॲसिड (हायड्रोक्लोरिक ॲसिड) तयार करतात, तेव्हा हे ॲसिड पोटाच्या आतील आवरणाला त्रास देते. यामुळे छातीत जळजळ किंवा आंबट ढेकर येतात.

दुधाचा चहा प्यायल्यानंतर लोकांना अनेकदा गॅसचा त्रास होतो. याचे कारण लॅक्टोज इनटॉलरन्स असू शकते, म्हणजेच ते दूध पचवू शकत नाहीत. आपल्या शरीरात लॅक्टेज नावाचे एन्झाइम असते जे दूध पचवण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, या एन्झाइमची कमतरता असल्यास आपण दूध पचवू शकत नाही. यामुळे ॲसिडिटी, गॅस आणि कधीकधी जुलाबासारख्या समस्या उद्भवू शकतात.

कॅफीनचे प्रमाण

काही लोकं रिकाम्या पोटी चहा पितात. चहामध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आम्लपित्त किंवा गॅसचा त्रास, किंवा अगदी ॲसिड रिफ्लक्ससुद्धा होऊ शकतो. दिवसभरात जास्त चहा प्यायल्याने या समस्या सतत उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी चहा पिणे ही एक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते आणि तज्ज्ञांच्या मते त्यासोबत काहीतरी खाणे महत्त्वाचे आहे.

चहा पिण्याची वेळ लक्षात घ्या

चहा पिण्याची वेळ देखील खूप महत्त्वाची आहे. दुधाचा चहा प्यायल्यावर आपल्याला आम्लपित्ताचा त्रास कधी होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कधीकधी सकाळी जास्त चहा प्यायल्याने समस्या निर्माण होऊ शकतात किंवा संध्याकाळी प्यायल्याने ती समस्या आणखी वाढू शकते. म्हणून जास्त चहा पिणे टाळा, रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा आणि चहा पिण्याची योग्य वेळ पाळा. या तीन गोष्टींकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे.

या सवयींमुळे ॲसिडिटीसुद्धा होते

आम्लपित्ताचे किंवा ॲसिड रिफ्लक्सचे मुख्य कारण आपली चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या वाईट सवयी आहेत.

बहुतेक लोकांची दैनंदिन दिनचर्या विस्कळीत झालेली असते. त्यांच्यापैकी बहुतेक जण अजिबात शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहत नाहीत. यामुळे चयापचय क्रिया मंदावण्यासह अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. आपण दिवसातून किमान 30 मिनिटे सक्रिय राहिले पाहिजे.

तळलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे पचनसंस्था देखील कमकुवत होते. भारतात लोकं प्रक्रिया केलेल्या किंवा इतर तेलांपासून बनवलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खातात. यामुळे पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य बिघडते. परिणामी आम्लपित्ताची समस्या सतत उद्भवते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय