AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart वर मोटोरोला एज 70 प्रो प्लसची विक्री सुरू, अशाप्रकारे मिळवा 5,250 रुपयांची सूट

मोटोरोलाने गेल्या आठवड्यात मोटोरोला एज 70 प्रो प्लस लाँच केला होता आणि 11 जून रोजी फ्लिपकार्टवर या हँडसेटची विक्री सुरू झाली आहे. हा फोन खरेदी करताना तुम्हाला 5250 रूपयांची बँक कार्ड सवलत मिळू शकते. चला तर मग तुम्ही देखील मोटोरोलाचा हा फोन खरेदी करत असाल तर

Flipkart वर मोटोरोला एज 70 प्रो प्लसची विक्री सुरू, अशाप्रकारे मिळवा 5,250 रुपयांची  सूट
Motorola Edge 70 Pro Plus
| Edited By: | Updated on: Jun 12, 2026 | 12:06 AM
Share

Motorola Edge 70 Pro Plus हा स्मार्टफोन 11 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पॉवरफूल 6500mAh बॅटरी, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट यांचा समावेश आहे. तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. तर हा हँडसेट खरेदी करताना तुम्हाला 5 हजार 250 रूपयांपर्यंतची बँक कार्ड सवलत देखील मिळत आहे, ज्यामुळे फोनच्या मुळ ‍किंमतीपेक्षा अतिरिक्त बचत करून स्वस्तात खरेदी करू शकता. चला तर मग या फोनची किंमत आणि त्यावरील सवलतीबद्दल जाणून घेऊयात.

भारतात मोटोरोला एज 70 प्रो प्लसची किंमत

या फोनच्या 256 GB स्टोरेज आणि 12 GB रॅम असलेल्या व्हेरिएंटची किंमत 47 हजार 999 रूपये इतकी आहे. ICICI आणि Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला 3 हजार रूपयांची सूट मिळू शकते. तसेच Flipkart Axis Bank कार्ड वरून पेमेंट केल्यास 5 हजार 250 रूपयांची सूट आणि Flipkart SBI Bank कार्ड वापरल्यास 2 हजार 400 रूपयांची सूट मिळेल. या किंमत श्रेणीमध्ये, हा फोन Nothing Phone (4a) Pro, OPPO Reno14 5G आणि Google Pixel 10a सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो.

मोटोरोला एज 70 प्रो+ माहिती

मोटोरोला एज 70 प्रो प्लस या फोनमध्ये अँड्रॉइड 16 वर आधारित हॅलो UI वर चालणाऱ्या या हँडसेटमध्ये 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 1.5K रिझोल्यूशन, 5200 निट्सची कमाल ब्राइटनेस, HDR10+, 144Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.

4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 एक्सट्रीम प्रोसेसरवर चालणाऱ्या या फोनमध्ये कूलिंगसाठी व्हेपर कूलिंग सिस्टीम आहे. कंपनीचा दावा आहे की याचा AnTuTu स्कोअर 2,400,000 आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50-मेगापिक्सलचा सोनी LYT710 प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर आणि 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फीसाठी 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 90W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात 5W वायर्ड आणि वायरलेस रिव्हर्स चार्जिंगची सुविधा देखील आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, 5G, ब्लूटूथ 5.4, एक USB टाइप-C पोर्ट आणि GPS यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप