AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gruh Pravesh : गृह प्रवेश करतांना या गोष्टींची घ्या विशेष काळजा, घरात नांदेल सुख संमृद्धी

गृहप्रवेश पूजेचे काही फायदे येथे आहेत. गृहप्रवेश मुहूर्तावर पूजा केल्याने वाईट शक्ती घरातून दूर राहतात आणि सकारात्मक ऊर्जा येते.

Gruh Pravesh : गृह प्रवेश करतांना या गोष्टींची घ्या विशेष काळजा, घरात नांदेल सुख संमृद्धी
गृह प्रवेशImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 01, 2023 | 6:05 PM
Share

मुंबई : स्वतःच्या हक्काच्या घरात राहणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. नवीन घरात जाणे लोकांसाठी एक खास प्रसंग असतो कारण ते नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. भारतीय परंपरेत गृहप्रवेशाला खूप महत्त्व आहे. नवीन घरात स्थायिक होण्यापूर्वी गृहप्रवेशाची (Gruh Prawesh Upay) पूजा करणे आवश्यक मानले जाते. गृह प्रवेश हा एक हिंदू विधी आहे ज्यामध्ये एका शुभ मुहूर्तावर पूजा समारंभ केला जातो.

गृहप्रवेश पूजा का आवश्यक आहे?

वास्तुशास्त्रानुसार, कुटुंबाच्या कल्याणासाठी नवीन घरात गृहप्रवेश पूजा करणे आवश्यक आहे. गृहप्रवेश पूजेचे काही फायदे येथे आहेत. गृहप्रवेश मुहूर्तावर पूजा केल्याने वाईट शक्ती घरातून दूर राहतात आणि सकारात्मक ऊर्जा येते. गृहप्रवेश विधीने घरातील वातावरण पवित्र आणि आध्यात्मिक राहते. हे घरातील रहिवाशांना समृद्धी, नशीब आणि चांगले आरोग्य आणते. गृहप्रवेश पूजा केल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो.

हे नियम लक्षात ठेवा

  1.  हिंदू धर्मात आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि पौष हे महिने गृह प्रवेशासाठी चांगले मानले जात नाहीत.
  2. माघ, फाल्गुन, वैशाख, ज्येष्ठ महिना हा वास्तू शांतीसाठी उत्तम काळ असल्याचे सांगण्यात आले आहे.
  3. घराच्या वास्तू शांतीसाठी शुभ मुहूर्ताची काळजी घ्या.
  4. गृहप्रवेश सोहळ्यात नवीन घरात प्रवेश करताना उजवा पाय पुढे ठेवा.
  5. घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि लिंबूपासून बनवलेली तार लावावी, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते.
  6. मंगल कलश घेऊन नवीन घरात प्रवेश करावा.
  7. मंगल कलशात शुद्ध पाणी भरून त्यात आंब्याच्या किंवा अशोकाच्या आठ पानांमध्ये नारळ ठेवा.
  8. मंत्रोच्चार करीत नवीन घरात प्रवेश करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित