Gudi Padwa 2023: गुढी अशा पद्धतीने उभारा, जाणून घ्या योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि विधी

गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी घरोघरी गुढी उभारून मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जातं. चला जाणून गुढी उभारण्याचा पूजा विधी आणि मुहूर्त

Gudi Padwa 2023: गुढी अशा पद्धतीने उभारा, जाणून घ्या योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि विधी
Gudi Padwa 2023: पाडव्याला गुढी उभारण्याची पद्धत, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 12:50 PM

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जातं. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढी पाडवा. या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. म्हणजेच चैत्र महिन्याची सुरुवात होते आणि नूत शालिवाहन शकवर्षाचा प्रारंभ होतो. चैत्र महिन्याती गुढी पाडवा वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देतो. निसर्गासह मानवाच्या आनंदात भर घालण्यास या दिवसापासून सुरुवात होते. उत्सवाच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांना भेटता येतं.

गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य

बांबू, मोठे वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, चाफ्याची फुलं, साखरेडी माळ, सुतळी, पाट, उटणं, सुगंधीत तेल, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, दाराला आंब्याचे तोरण, रांगोळी, पाट, तुपाचा दिवा, विड्याची पानं, फळं, सुपारी, ताम्हण पळी, हार आणि सुटी फुलं इत्यादी साहित्याची आवश्यकता असते. प्रसादासाठी कडुनिंबाची कोवळी पानं, फुले, चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे, हिंग आणि गुळ इत्यादी वस्तू लागतात.

गुढी उभारण्याचा पूजा विधी

गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी बांबू स्वच्छ धुवून तेल लावावं. पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगाला उटणं आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. दाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधवं. सूर्योदयानंतर लगेचच गुढी उभारण्याचा विधी सुरु करावा. बांबूच्या टोकाला वस्त्र बांधून घ्यावं. कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे आणि स्वस्तिक हे शुभ चिन्ह काढावं. बांबूला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पानं, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून घ्यावी.

तांब्याचा गडू त्या बांबूच्या टोकावर उपडा ठेवावा. त्यानंतर दाराबाहेर दिसेल अशा स्थितीत गुढी पाटावर उभारावा. पाटावर रांगोळी काढावी. गुढी पाडव्या पारंपरिक पद्धतीने चैत्रांगण रांगोळी काढावी. आराध्य दैवत गणपतीचं आव्हान करून गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नम: या मंत्राचा जाप करून पुजेस सुरुवात करावी. गुढी उभारल्यानंतर ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद। प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।। ही प्रार्थना म्हणावी.

काठीला गंध, फुलं, अक्षता वाहव्यात. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करावी. पुरणपोळी, श्रीखंड, दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवण्यापूर्वी हळद-कुंकू, फुले वाहून आणि अक्षता टाकून पूजा करावी. निर्माल्य वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्य कलशात सोडुन द्यावे.

गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त

गुढी पाडवा 22 मार्च 2023 रोजी असून गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 29 मिनिटं ते सकाळी 7 वाजून 39 मिनिटं असा आहे. सूर्यास्ताची वेळ 6 वाजून 49 मिनिटांची आहे. सूर्यास्तापूर्वी म्हणजेच 10 ते 20 मिनिटं आधी गुढी उतरावावा.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.