AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gupt Navratri 2023 : गुप्त नवरात्रीत पूर्ण होतील सर्व मनोकामना, अशा प्रकारे करा देवीची आराधना

तंत्रविद्येसाठी गुप्त नवरात्री विशेष मानली जाते. यंदा 19 जूनपासून आषाढ नवरात्रीला सुरुवात होत आहे. आणि ती 28 जून रोजी संपणार आहे.

Gupt Navratri 2023 : गुप्त नवरात्रीत पूर्ण होतील सर्व मनोकामना, अशा प्रकारे करा देवीची आराधना
गुप्त नवरात्रीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 17, 2023 | 12:14 PM
Share

मुंबई : वर्षात चार नवरात्र येतात. त्यापैकी दोन नवरात्रांना दृश्य नवरात्र म्हणतात. ज्यामध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्रीचा समावेश होतो. याशिवाय गुप्त नवरात्र (Gupt Navratri 2023) म्हणून ओळखल्या जाणार्‍या दोन नवरात्री माघा आणि आषाढ महिन्यात येतात. तंत्रविद्येसाठी गुप्त नवरात्री विशेष मानली जाते. यंदा 19 जूनपासून आषाढ नवरात्रीला सुरुवात होत आहे. आणि ती 28 जून रोजी संपणार आहे. गुप्त नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा-अर्चा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे सांगितले जाते. याशिवाय गुप्त नवरात्रीमध्ये काही उपाय केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

गुप्त नवरात्रीमध्ये करा हे खास उपाय करा

  • ज्योतिष शास्त्रानुसार गुप्त नवरात्रीमध्ये पूजेदरम्यान माता दुर्गाला लाल रंगाची फुले अर्पण करावीत. असे म्हटले जाते की लाल रंगाचे फूल अर्पण केल्याने आई प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.
  •  गुप्त नवरात्रीमध्ये माता दुर्गाला लाल रंगाची फुले तसेच दागिने अर्पण करावेत. असं म्हणतात की यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात.
  • गुप्त नवरात्रीच्या 9 दिवसांत घरामध्ये लवंग आणि कापूरने आरती करावी. असे म्हणतात की असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि समृद्धी येते.
  • गुप्त नवरात्रीमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावून माता दुर्गाच्या ‘ओम दूं दुर्गाय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे देवी लवकर प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते.
  • ज्योतिषांच्या मते, गुप्त नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी नऊ मुलींना लोण्यापासून बनवलेली खीर खाऊ घाला आणि दक्षिणा देऊन त्यांना चरणस्पर्श करा. त्यामुळे करिअरमध्ये यश मिळते.
  • गुप्त नवरात्रीच्या काळात 9 गोमती चक्रे घेऊन घरातील देवघरात माता दुर्गेसमोर ठेवा. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे पैशाचा फायदा होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल