नवीन वर्ष पहिल्या दिवशी करा गुरु प्रदोष व्रत, जाणुन घ्या शुभ वेळ आणि महत्व

प्रदोष व्रत खूप फलदायी आहे. हे व्रत केल्याने भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद मिळतात. 2026 वर्षातील पहिला व्रत 1 जानेवारी रोजी असणार आहे. चला तर मग नवीन वर्षातील या गुरू प्रदोष व्रताचे महत्व आणि शुभ वेळ जाणून घेऊयात.

नवीन वर्ष पहिल्या दिवशी करा गुरु प्रदोष व्रत, जाणुन घ्या शुभ वेळ आणि महत्व
| Edited By: | Updated on: Dec 31, 2025 | 4:21 PM

सनातन धर्मात, प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते. एक प्रदोष व्रत शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला आणि दुसरा कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला केला जातो. प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी प्रदोष काळात भगवान शिव आणि पार्वती देवीची पूजा केली जाते. ज्या आठवड्याला प्रदोष व्रत असते त्या दिवसाचे नाव त्या दिवसावरून ठेवले जाते. प्रदोष व्रत खूप फलदायी असते. हे व्रत केल्याने भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. तसेच घर समृद्ध राहते. आर्थिक समस्यांपासून ते लग्नापर्यंत जीवनातील सर्व संकटे दूर होतात. मृत्यूनंतर भगवान शिवाच्या चरणी स्थान मिळते. 2026 वर्षातील पहिले व्रत 1 जानेवारी रोजी आहे. तसेच या दिवशी गुरुवार हा दिवस असेल.

प्रदोष व्रत 2026 ची तारीख

दृक पंचांगानुसार, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 31 डिसेंबर 2025 रोजी बुधवार रोजी पहाटे 1 वाजून 48 मिनिटांनी सुरू होईल. त्रयोदशी तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 10 वाजून 23 मिनिटांनी संपेल. म्हणून,उदयतिथीनुसार 2026 वर्षातील पहिले प्रदोष व्रत 1 जानेवारी रोजी केले जाईल.

गुरु प्रदोष व्रताचे महत्त्व

जेव्हा जेव्हा प्रदोष व्रत गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु प्रदोष म्हणतात. गुरु प्रदोषाला बृहस्पति प्रदोष असेही म्हणतात. आध्यात्मिक प्रगती आणि धार्मिक ज्ञान प्राप्तीसाठी गुरु प्रदोष व्रत महत्त्वाचे आहे. गुरु प्रदोष व्रत योग्य पद्धतीने केल्याने ज्ञान, शिक्षण, संपत्ती, धार्मिकता आणि सुख आणि समृद्धी मिळते. पुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीने त्रयोदशीच्या रात्री भगवान शिवाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवून दर्शन घेतले तर त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तसेच जो भक्त या दिवशी मनोभावे शिवशक्तीची पुजा आराधना करतो त्याची मनोकामना शिवपार्वती पूर्ण करतात अशी व्रताची मान्यता आहे. या व्रताने भगवान शिवाचे आशीर्वाद मिळाल्याने यश प्राप्ती होते असा समज आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही