AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Chalisa : या कारणासाठी रोज करावा हनुमान चालीसाचा पाठ, होताता चमत्कारिक फायदे

Hanuman Chalisa एखाद्या व्यक्तीवर कोणतेही संकट आले तर हनुमानाची पूजा करताना हनुमान चालिसाचे पठण करावे. त्याचे सर्व संकट दूर होतात. चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठण केल्याने कोणते फायदे होतात.

Hanuman Chalisa : या कारणासाठी रोज करावा हनुमान चालीसाचा पाठ, होताता चमत्कारिक फायदे
हनुमान Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 10, 2023 | 8:13 AM
Share

मुंबई : हनुमान चालिसाशिवाय (Hanuman Chalisa) हनुमानजीची पूजा पूर्ण होत नाही. हनुमान चालीसा ही कवी तुलसीदास यांनी लिहिली होती, शास्त्रात तिचे खूप महत्त्व आहे. असे म्हणतात की याचा जप केल्याने शक्ती, धैर्य आणि संरक्षण मिळते. एखाद्या व्यक्तीवर कोणतेही संकट आले तर हनुमानाची पूजा करताना हनुमान चालिसाचे पठण करावे. त्याचे सर्व संकट दूर होतात. चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठण केल्याने कोणते फायदे होतात. शास्त्रानुसार हनुमान चालिसाचे 100 वेळा पठण करावे. परंतु जर तुम्ही हे करू शकत नसाल तर किमान 7, 11 किंवा 21 वेळा पठण करावे. हनुमान चालिसाच्या एका ओळीत या गोष्टीचा उल्लेख आहे.

हनुमान चालिसाचा जप करण्याचे फायदे

  • जर एखाद्या व्यक्तीच्या घरात कौटुंबिक कलह बराच काळ चालू असेल, तर दर मंगळवारी हनुमानजीची पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्यास कलह दूर होतो.
  • हनुमान चालिसाचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा संपते आणि भूत-प्रेतांच्या सावलीपासूनही मुक्ती मिळते.
  • रोज हनुमान चालिसाचा पाठ करणार्‍या लोकांपासून संकटे आणि नकारात्मक उर्जा नेहमी दूर राहतात.
  • हनुमानजी सर्वात शक्तिशाली आणि महावीर आहेत, त्यांचे ध्यान केल्याने मनुष्य बलवान होतो आणि शक्ती प्राप्त होते.
  • हनुमान चालिसाचा पाठ केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. हे पाठ केल्याने माणसाचे आरोग्य सुधारते आणि त्याच्या सर्व वेदनांचा अंत होतो.
  • हनुमानजी विद्वान आणि प्रतिभावान तसेच ज्ञानी आहेत. हनुमान चालिसाचे पठण जे खऱ्या मनाने करतात त्यांना बुद्धी आणि कुशाग्रताही प्राप्त होते.
  • हनुमान चालिसाचा पाठ केल्याने शरीरात सकारात्मकता येते आणि वाईट विचार नष्ट होतात. ते सतत वाचल्याने तणावाचा काळही संपतो.
  • भगवान हनुमान हे अष्टसिद्धी आणि नवनिधि दाता आहेत. जेव्हा जेव्हा कोणावर आर्थिक संकट येते तेव्हा मनापासून हनुमानजीचे ध्यान करून या चालिसाचा पाठ सुरू करा. हे खूप लवकर फायदे देते.

हनुमान चालिसाचे पठण करण्याची योग्य वेळ कोणती?

हनुमान चालिसाचे पठण करण्याची उत्तम वेळ पहाटे किंवा संध्याकाळ मानली जाते. पण हे लक्षात ठेवा की हनुमान चालिसाचा पाठ करताना त्यापूर्वी स्नान करून शुद्ध व्हावे. दुसरीकडे, जर तुम्ही संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तुमचे हात पाय चांगले धुवा आणि स्वच्छ कपडे घाला आणि नंतर पठण सुरू करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?