AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनगटावर लाल धागा का बांधतात? तो किती दिवस ठेवावा? काढल्यानंतर त्याचं काय करावे? जाणून घ्या A टू Z माहिती…

भारतीय संस्कृतीत मनगटावर लाल किंवा पिवळा कलावा (धागा) बांधण्याची जुनी परंपरा आहे. धार्मिक विधींमध्ये वापरला जाणारा हा धागा केवळ शुभ प्रतीक नाही, तर त्याचे ज्योतिषशास्त्राशीही जवळचे संबंध आहेत.

मनगटावर लाल धागा का बांधतात? तो किती दिवस ठेवावा? काढल्यानंतर त्याचं काय करावे? जाणून घ्या A टू Z माहिती...
kalava
| Updated on: Jul 22, 2025 | 3:56 PM
Share

भारतीय संस्कृतीत अनेक शतकांपासून मनगटावर लाल धागा (कलावा) बांधण्याची परंपरा असते. पूजा-पाठ आणि धार्मिक विधींमध्ये वापरला जाणारा लाल आणि पिवळ्या रंगाचा धागा केवळ एक प्रतीक नसून, त्याचे ज्योतिषशास्त्राशीही सखोल संबंध असतात. पण तुमच्या हातात बांधला जाणारा हा लाल किंवा पिवळा धागा तुम्हाला किती दिवसांनी काढता येतो, हे तुम्हाला माहितीये का? नाही ना, आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा का बांधवा?

हिंदू धर्मात लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा हातात बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या वेळी हातात धागा बांधणे हे शुभ मानले जाते. या कलाव्यातील लाल रंग हा मंगळ ग्रहाशी संबंधित असतो. तो ऊर्जा आणि समृद्धी वाढवतो, असे मानले जाते. तर पिवळा रंग हा गुरु ग्रहाशी संबंधित असून तो संरक्षण प्रदान करतो. तसेच यामुळे जीवनात तुमची प्रगती देखील होते. म्हणजे तुमच्या मनगटावर बांधलेला हा साधा धागा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि सुरक्षा कवच देतो.

हातातील लाल धागा कधी काढावा?

ज्योतिषाचार्य अनीष व्यास यांच्या मते, तुमच्या हातावर असलेल्या लाल धाग्याचा सकारात्मक प्रभाव फक्त २१ दिवसांपर्यंत टिकतो. त्यानंतर त्याचा शुभ प्रभाव कमी होऊ लागतो. त्यामुळेच २१ दिवसांनी हा लाल धागा मनगटावरुन काढणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक लोक जुन्या धाग्यावरच नवीन धागा बांधतात किंवा कधी कधी महिनेभर तोच धागा हातात बांधून ठेवतात. पण ही सर्वात मोठी चूक मानली जाते.

धागा काढल्यानंतर त्याचे काय करावे?

जर तुम्ही तुमच्या हातातील धागा २१ दिवसांपेक्षा जास्त काळ हातात ठेवला तर त्याचे नकारात्मक परिणामही दिसू शकतात, असा सल्ला ज्योतिषाचार्य देतात. तुमच्या हातात बांधलेला हा धागा कच्च्या सूताचा बनलेला असतो. त्यामुळे तो पर्यावरणात सहजपणे मिसळून जातो. त्यामुळे २१ दिवसांनी हातातील धागा काढल्यानंतर तो कोणत्याही अशुद्ध ठिकाणी किंवा कचऱ्यात न टाकता, कुंडीतील मातीत किंवा झाडाच्या खाली टाका.

यामुळे निसर्गाशी आपले नाते जोडले जाते. तसेच त्याचा पवित्र उद्देशही कायम राहतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही हातात धागा बांधाल, तेव्हा या नियमांचे पालन नक्की करा. कारण या छोट्या गोष्टींचे नियम पाळल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता येते.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच