
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. ते अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात काही लोक हे आयुष्यभर खूप कष्ट करतात, मात्र त्यांना लवकर यश मिळत नाही, त्यांना ज्या ठिकाणी पोहोचायचं असतं, त्या ठिकाणी ते कधीच पोहोचू शकत नाहीत, मात्र या उलट काही लोक असे असतात की जे कमी कष्टामध्ये आणि कमी वयातच प्रचंड यश मिळवतात. त्यांना जिथे जायचं असतं, जे मिळवायचं असतं त्या गोष्टी हे लोक सहज मिळवतात. असं का होतं? तर या गोष्टी फक्त चुकीच्या प्रयत्नांमुळे आणि दिशा निश्चित नसल्यामुळे घडतात, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गोष्टींचं पालन केल्यास तुम्हाला यश सहज मिळू शकेल, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
मनावर नियंत्रण – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला यश मिळवायचं असतं, दूरवरचा पल्ला गाठायचा असतो, तेव्हा सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, जगात असे काही लोक असतात, जे थोड्याशा यशानं देखील हुरळून जातात. सारासार विचार कण्याची क्षमता गमावून बसतात, अशा लोकांचं त्यांच्या मनावर नियंत्रण राहात नाही, परिणामी त्यांचं लक्ष त्यांच्या ध्येयापासून विचलित होते. जेव्हा तुमचं लक्ष तुमच्या ध्येयापासून विचलित होतं, तेव्हा तुम्हाला अपयश येतं. मात्र असे देखील काही लोक असतात, जेव्हा त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळतं, तेव्हा ते शांत असतात, असे लोक आता आपल्याला पुढचं यश कसं मिळावायचं आहे? याचा विचार करतात, आणि यातूनच त्यांना यशाचा मार्ग सापडतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशासाठी तुमचं तुमच्या मनावर नियंत्रण असणं गरजेचं आहे, असं चाणक्य म्हणतात.
प्रयत्नांची दिशा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही ठरवता की मला ही गोष्ट प्राप्त करायची आहे, तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय कोणता, प्रयत्नाची दिशा काय ठेवायची याचा विचार करा, अनेकदा आपण ठरवतो, की मला या गावाला जायचं आहे, मात्र तुम्ही जर उलट्या दिशेनं चालत गेलात तर आयुष्यात कधीच तुम्ही तुमच्या मुक्कामापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, त्यामुळे प्रयत्नाची दिशा योग्य असली पाहिजे.
संयम – चाणक्य म्हणतात संयम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, अनेकजण पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं तर प्रयत्न करणं सोडून देतात, मात्र
अपयश आल्यानंतर देखील जो वारंवार प्रयत्न करतो, तो यशस्वी होतोच.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)