तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापित करायचे असेल तर ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात
सनातन धर्मात शिवलिंगाचे विशेष महत्त्व आहे. तुमच्या देवघरात शिवलिंग स्थापित करण्यापूर्वी त्याच्या पूजेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रात शिवलिंग स्थापित करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

महादेव हे अतिशय सहज प्रसन्न होणारे देव मानले जातात. कारण जो कोणी भक्त त्यांना खऱ्या मनाने हाक मारतो, त्याची इच्छा नक्की पूर्ण करतात. भगवान शंकर यांना कोणत्याही मोठ्या पूजेची आवश्यकता नसते. त्यांना तुम्ही एक तांब्याभर पाणी अर्पण करूनही ते प्रसन्न होतात. तर अशावेळेस तूमच्या घरातील देवघरामध्ये शिवलिंग ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की घरी शिवलिंगाची नियमित पूजा आणि जल अर्पण केल्याने भक्ताला भगवान शिवाकडून विशेष आशीर्वाद मिळतो. म्हणून तुम्ही जर तुमच्या घरात शिवलिंग स्थापित करण्याचा विचार करत असाल तर या पाच गोष्टी लक्षात ठेवा.
1. शिवलिंगाची योग्य दिशा कोणती आहे?
घराची उत्तर किंवा ईशान्य दिशा म्हणजेच ईशान्य कोपरा शिवलिंग स्थापित करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेने शिवलिंग स्थापित केल्याने घरात आनंद आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते.
2. योग्य आकार
वास्तुशास्त्रानुसार देवघरात अंगठ्याच्या आकाराचे शिवलिंग ठेवणे शुभ असते. खूप मोठे किंवा खूप लहान शिवलिंग ठेवणे टाळावे.
3. किती शिवलिंगे ठेवणे शुभ आहे?
वास्तुशास्त्रानुसार घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असू नयेत. अन्यथा त्याचे चांगले परिणाम मिळणार नाहीत. एकापेक्षा जास्त शिवलिंगे असल्याने देखील वास्तुदोष होऊ शकतात.
4. असे शिवलिंग ठेवू नका
तुमच्या देवघरात कधीही तुटलेले शिवलिंग ठेवू नका, कारण त्यामुळे नकारात्मक परिणाम तुमच्या घरात आणि घरातील व्यक्तीच्या जीवनावर होऊ शकतो. जर तुमचे शिवलिंग काही कारणास्तव तुटले असेल तर ते स्वच्छ, वाहत्या पाण्यात विसर्जन करा आणि तुमच्या चुकांबद्दल माफी मागा. असे केल्याने तुम्हाला नकारात्मक परिणाम टाळण्यास मदत होऊ शकते.
5. या गोष्टी देखील लक्षात ठेवा
शिवलिंग कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. ते नेहमी एखाद्या कापडावर किंवा स्वच्छ चौंरगावर ठेवावे. शिवाय, ते कधीही तुमच्या बेडरूममध्ये ठेवू नका. यामुळे नकारात्मकता वाढू शकते. तसेच शिवलिंगाची दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्याची पूजा व्यवस्थित करणे खुप महत्त्वाचे आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
